Bad Roads

सभोवतालच्या खड्डेमय रस्त्यांनी हिरावला नवरगावचा विकास; व्यापारी बाजारपेठ संकटात, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक त्रस्त!

तालुक्यातील सर्वात मोठे आणि १५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले नवरगाव आज विकासाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडत असल्याचे चित्र आहे.

सभोवतालच्या खड्डेमय रस्त्यांनी हिरावला नवरगावचा विकास; व्यापारी बाजारपेठ संकटात, प्रशासकीय अनास्थेमुळे नागरिक त्रस्त!

Bad Roads

४० ते ५० गावांच्या प्रमुख बाजारपेठेवर रस्त्यांच्या दुरवस्थेचा परिणाम; नागरिकांकडून तातडीने डांबरीकरणाची मागणी

सिंदेवाही : तालुक्यातील सर्वात मोठे आणि १५ हजारांहून अधिक लोकसंख्या असलेले नवरगाव आज विकासाच्या मुख्य प्रवाहातून मागे पडत असल्याचे चित्र आहे. एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेला घोंगडी उद्योग, ७ ते ८ मोठ्या भात गिरण्या तसेच समृद्ध सांस्कृतिक व शैक्षणिक वारसा लाभलेले हे गाव आज प्रशासकीय अनास्था आणि राजकीय उदासीनतेचा बळी ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. परिसरातील ४० ते ५० गावांची प्रमुख व्यापारपेठ म्हणून ओळख असलेल्या नवरगावच्या विकासाला सभोवतालच्या अत्यंत दुरवस्था झालेल्या व खड्डेमय रस्त्यांमुळे मोठा फटका बसला असून, येथील अर्थव्यवस्थाही संकटात सापडली आहे.

सध्या नवरगावला इतर प्रमुख गावांशी जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रमुख मार्गांची स्थिती

  • नवरगाव – चिखलगाव मार्ग : हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला असून वाहतुकीसाठी अत्यंत अयोग्य आणि धोकादायक ठरत आहे.

  • नवरगाव – सिंदेवाही व नवरगाव – चिमूर मार्ग : अनेक वर्षांपासून हे मार्ग अरुंद (वन-वे) आहेत. वाढत्या वाहतुकीचा विचार करता या मार्गांचे महामार्गाच्या धर्तीवर तातडीने रुंदीकरण करण्याची गरज व्यक्त होत आहे.
  • नवरगाव – नाचनभट्टी व शिवणी मार्ग : या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ते केवळ नावापुरते उरल्याची परिस्थिती आहे.
  • नवरगाव – मिनघरी मार्ग : आजच्या आधुनिक युगातही या मार्गावर अद्याप धड पक्का रस्ता तयार झालेला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

बाजारपेठेला मोठा फटका

राज्यात महामार्ग आणि दर्जेदार दळणवळणाच्या माध्यमातून विकासाचे दावे केले जात असताना नवरगावकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्राहकांनी नवरगावच्या बाजारपेठेकडे पाठ फिरवली असून ते शेजारील शहरांकडे वळत आहेत. परिणामी, स्थानिक व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून एकेकाळी गजबजलेली बाजारपेठ ओस पडत चालली आहे.

नागरिकांची तीव्र मागणी

१७ सदस्यीय ग्रामपंचायत असलेल्या नवरगावमध्ये तालुका बनण्याची पूर्ण क्षमता आणि पात्रता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे गाव आजही उपेक्षित राहिल्याची भावना व्यक्त केली जात आहे. नवरगाव आणि पंचक्रोशीतील सर्व रस्त्यांची तात्काळ सुधारणा करून डांबरीकरण करण्यात यावे, अशी तीव्र मागणी नागरिक आणि व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष न दिल्यास येथील व्यापार आणि विकास पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ! केंद्रावर संगणकच नाही; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा गोंधळ! केंद्रावर संगणकच नाही; प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Mahajyoti Scholarship Exam: महाज्योतीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील सन ब्राईट स्कूलमध्ये पोहोचलेल्या विद्यार्थिनींना परीक्षा न देताच तब्बल दोन तास प्रतीक्षा करावी लागली.

Oct 08, 2026
980 नव्या कृषी पर्यटन केंद्रांची घोषणा; जुन्या केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष?

980 नव्या कृषी पर्यटन केंद्रांची घोषणा; जुन्या केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष?

Agri-tourism Centre: राज्यात नव्याने 980 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देणार असल्याची बातमी समोर आली आहे. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे, हवामानाचे संकट कायम आहे...

Oct 08, 2026
नाना पाटेकरांच्या निधनाने मुख्यमंत्री फडणवीस भावूक; म्हणाले, ‘भाऊ आणि मार्गदर्शक गमावला’

नाना पाटेकरांच्या निधनाने मुख्यमंत्री फडणवीस भावूक; म्हणाले, ‘भाऊ आणि मार्गदर्शक गमावला’

नाना पाटेकरांच्या निधनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक झाले. ‘भाऊ आणि मार्गदर्शक गमावला’, अशी भावना व्यक्त करत त्यांनी नानांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला.

Oct 08, 2026
पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

पेपरफुटी प्रकरणात MPSC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह; हंगामी अध्यक्षांसह अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची मागणी

MPSC Paper Leak Case: महाराष्ट्र लोकसेवा आयोग पेपरफुटी प्रकरण, तपासाची व्याप्ती वाढवून अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेल्या डॉ. अभय वाघ यांचीही चौकशी करावी, अशी मागणी

Oct 07, 2026
महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

महाराष्ट्रात कुष्ठरोगाचे धक्कादायक वास्तव! नऊ वर्षांत 1.57 लाख नवीन रुग्ण; शोधमोहिमेत 44 हजारांहून अधिक रुग्ण

Maharashtra Leprosy Detection Campaign: महाराष्ट्राला कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी शासनाकडून विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू असतानाच राज्यातील कुष्ठरोगाची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीतून समोर आले..

Oct 07, 2026