Bachchu Kadu

बच्चू कडूंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल; तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप

चंद्रपुरात बच्चू कडूंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल. विनापरवानगी मोर्चा, प्रक्षोभक वक्तव्ये आणि तहसीलदारांना धमकी दिल्याचा आरोप.

बच्चू कडूंसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल; तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप

चंद्रपुरातील घुग्घूस येथे विनापरवानगी १५ किलोमीटरचा पायी मोर्चा; प्रक्षोभक वक्तव्ये आणि पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी कारवाई

चंद्रपूर : स्थानिक भूमिपुत्रांना कोळसा खाणीत रोजगारात प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामुळे आमदार बच्चू कडू अडचणीत आले आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाशी संबंधित नेते आणि आमदार बच्चू कडू यांच्यासह सहा जणांविरोधात घुग्घूस पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. विनापरवानगी पायी मोर्चा काढणे, बेकायदेशीर जमाव जमवणे तसेच पोलिसांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणे आणि तहसीलदारांना पुलाखाली फेकण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

८० टक्के नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी

चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलि कोळसा खाणींमधील ८० टक्के नोकऱ्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य मिळावे, यासह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान आवश्यक परवानगी न घेता पायी मार्च काढण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

या मोर्चादरम्यान भाषणातून पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली आणि तहसीलदारांना पुलाखाली फेकून देण्याची धमकी देण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर घुग्घूस पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह अन्य पाच जणांविरोधात कायदेशीर कारवाई केली.

बीएनएससह महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा

या प्रकरणात बच्चू कडू यांच्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक मुकेश जिवतोडे, रोशन राजाराम हरबडे, अमोल नथ्थूजी मांढरे, नथ्थू भाऊराव नवले आणि सतीश बीडकर यांची नावे आरोपी म्हणून नोंदवण्यात आली आहेत.

पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम १९०, १९१(२), २९६, २२३, २२४ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ चाही समावेश करण्यात आला आहे.

१५ किलोमीटरचा पायी मोर्चा; सांगता सभेत पोलिसांवर टीका

बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील पैनगंगा पुलावरून मोर्चाला सुरुवात केली होती. सुमारे १५ किलोमीटरचे अंतर पायी पार केल्यानंतर हा मोर्चा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस शहरातील कारगिल चौकात पोहोचला. येथे मोर्चाची सांगता सभा झाली.

या सभेदरम्यान प्रकल्पग्रस्त आंदोलकांना पोलिसांकडून विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. पोलिसांच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी आक्षेपार्ह विधाने केल्याचा आरोप आहे. याच वक्तव्यांमुळे आणि मोर्चाच्या आयोजनासंदर्भातील कथित नियमभंगामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या कारवाईनंतर बच्चू कडू आणि त्यांच्यासोबतच्या पाच जणांविरोधातील प्रकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

 

संबंधित सामग्री

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत ठिणगी! भाजपला उमेदवारही मिळत नाही? चंद्रकांत रघुवंशींचा टोला

जिल्हा परिषद निवडणुकीआधीच महायुतीत ठिणगी! भाजपला उमेदवारही मिळत नाही? चंद्रकांत रघुवंशींचा टोला

नंदुरबारमध्ये भाजप-शिंदेसेनेत संघर्ष! स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपवर हल्लाबोल.

Nov 07, 2026
मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर अश्विनी भिडे नाराज; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी!

मुंबईतील SRA च्या कारभारावर आयुक्त अश्विनी भिडे यांचे गंभीर आक्षेप! विशेष नियोजन प्राधिकरणाचे अधिकार काढण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

Nov 07, 2026
शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृतीत सुधारणा, थेट सिल्व्हर ओक्सवर रवाना

शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. छातीतील संसर्गावरील उपचारानंतर प्रकृती स्थिर असून ते सिल्व्हर ओक्सवर परतले.

Nov 07, 2026
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले...

Nov 06, 2026
गोकुळ दूध संघाच्या सत्तेवरून राज ठाकरे भाजपवर संतापले; ‘लोकशाही वाचवा’ मोर्चावरून लगावला जोरदार टोला!

गोकुळ दूध संघाच्या सत्तेवरून राज ठाकरे भाजपवर संतापले; ‘लोकशाही वाचवा’ मोर्चावरून लगावला जोरदार टोला!

गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षावरून राज ठाकरे आक्रमक; भाजपने विरोधकांचे बहुमत स्वीकारावे, असा टोला लगावत लोकशाहीच्या भूमिकेवर सवाल.

Nov 06, 2026