Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज

श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांना अखेरचा निरोप

Lilabai Dnyaneshwar Maharaj: थ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज (आईसाहेब) यांच्या पार्थिवावर रविवारी पाराबाई स्मशानभूमीत


श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांना अखेरचा निरोप 

Lilabai Dnyaneshwar Maharaj |

औसा (Lilabai Dnyaneshwar Maharaj) : येथील नाथ संस्थानचे पाचवे पीठाधिपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज (आईसाहेब) यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.23) पाराबाई स्मशानभूमीत प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीत्वात साश्रू नयनांनी दुपारी 2.30 वाजता अंत्य संस्कार करण्यात आले. शनिवारी हैदराबाद येथे 7.50 वाजता वयाच्या 85 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.

रविवारी पहाटे औसा येथे नाथ संस्थानात श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांचा पार्थिव देह पोहोचला. दुपारी 2 वाजता नाथ सभागृहातून अंत्ययात्रा निघाली. शेकडो दिंड्या, वारकरी यांच्या सहभागात ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज यांच्या नाम घोषात पाराबाई स्मशानभूमीत पार्थिव देह आणण्यात आला.  महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा यासह लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर जिल्ह्यातून हजारो शिष्य, भक्त व स्नेही परिवार अंत्ययात्रेत सहभागी होता.  पाराबाई येथे अंत्यसंस्कारासाठी आईसाहेबांचा पार्थिव आणल्यानंतर वीरशैव लिंगायत धर्माच्या शास्त्र नियमाने अंत्यविधी संपन्न झाला ष. ब्र. 108 डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व सोलापूर येथील विद्वत स्वामींच्या मंत्रघोषात आईसाहेबांचा समाधी सोहळा संपन्न झाला.

 यावेळी श्री गोरखनाथ महाराज, श्री गहिनीनाथ महाराज, श्री गुरुबाबा महाराज, श्री बसवंतराय देशमुख, डॉक्टर विरनाथ उर्फ राजाभाऊ महाराज, श्री मच्छिंद्रनाथ महाराज, श्री रवींद्रनाथ महाराज, श्री श्रीनाथ गोरखनाथ महाराज, श्री सिद्धराज महाराज, श्री श्रीरंग महाराज, श्री आदिनाथ महाराज, डॉ.अमर मच्छिंद्रनाथ महाराज, श्री ज्ञानराज महाराज, श्री अनिरुद्ध महाराज, चिरंजीव गीतेश्वर महाराज, व महाराज कुटुंबीय यांनी शिवाचार्य व स्वामी महाराजांच्या निर्देशाप्रमाणे समाधी विधी संपन्न केला. यावेळी महाराज कुटुंबातील सर्व सदस्य महिला पाहुणे नातेवाईक यांचीही  उपस्थिती होती. 

आईसाहेबांच्या अंत्यदर्शन व अंत्ययात्रेसाठी श्री गोविंदराव माकणे, श्री कपिल माकणे, श्री दुकानदार गुलबर्गा श्रीबसवंतीजी, श्री रेशमे गुरुजी, श्री. लिंबंनअप्पा रेशमे महाराज, कापसे आप्पा, श्री तंमप्पा मसरे व महाराजांचे नातेवाईक यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक, क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: