रब्बी पिकाच्या पेरणीसाठी शेतकर्यांना दिलासा
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Siddheshwar Dam) : तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पूर्णा कालव्यातून रब्बी पिकांसाठी पहिल्या पाणीपाळीचे आवर्तन दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता सोडण्यात आले असून धरणाच्या तीन गेटमधून ४२० क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे सोडलेल्या या पहिल्या आवर्तनाने हिंगोली परभणी नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना रब्बीतील पेरणीसाठी मोठा फायदा होणार असून कालव्या जवळील शेतकर्यांकडून रब्बी पिकांना पाणी घेण्यासाठी लगबग सुरू आहे.
यावर्षी सिद्धेश्वर धरणातून कालव्याद्वारे (Aundha Nagnath Siddheshwar Dam) रब्बी पिकांसाठी तीन पाणी पाळ्या मंजूर करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने दिनांक एक नोव्हेंबर रोजी पहिल्या आवर्तनातून रब्बी पिकांसाठी धरणाच्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. एक आवर्तन वीस दिवस चालणार आहे. सोडलेल्या पाण्यामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव, सिद्धेश्वर, सुकापुर, अंजनवाडी, जवळा बाजार, सह अनेक गावातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे तसेच वसमत सह हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार असून याचा शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.
या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्याच्या विहीर,बोअर वेल ची पाणीपातळी झपाट्याने खाली होऊन आटली आहे त्यामुळे शेतकर्यांना रब्बीतील गहू हरभरासह इतर पिकांची पेरणी करता आली नाही परंतु एक नोव्हेंबर रोजी कॅनल द्वारे सुटलेल्या या पाण्यामुळे शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतकर्यातून समाधान व्यक्त केल्या जात आहे. शेतकरी आता रब्बीतील गहू हरभरा व ज्वारी पेरणीसाठी रान ओलावून पेरणीची लगबग करणार आहेत. क्षत्रिय मागणीनुसार कालव्यात विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार असल्याची माहिती पूर्ण पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.