औंढा जिंतूर रोडवर माथा गावाजवळ घडली भीषण घटना
औंढा नागनाथ (Aundha Nagnath Car Accident) : औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर माथा गावाजवळ असलेल्या कृषी महाविद्यालय जवळ औंढा नागनाथ कडून जिंतूर कडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार सरळ रस्त्याच्या खाली असलेल्या खड्ड्यात कोसळली यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक एक नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजे दरम्यान घडली आहे.
कुरेशी नगर परभणी येथील शेख कुटुंबीय स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच ०४ एच एन १४१९ या कारणे जिंतूरकडे जात असताना कार वरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार माथा गावाजवळील कृषी महाविद्यालयाजवळ जोराने रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली. या भीषण अपघातात शेख नजीर शेख जिलानी वय ३५ वर्ष, शेख आदिल ११ वर्ष,शेख शेबू शेख नफीस वय ३२ वर्ष, शेख काफिया वय १२ वर्ष, सर्व राहणार कुरेशी नगर परभणी तसेच चालक माऊली सिताराम पोडे वय ३५ वर्षे राहणार कौवडगाव असे पाच जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ, जमादार दिलीप नाईक,शाहेद सय्यद, तानाजी ढाकरे,ओंकारेश्वर रांजणेकर, रमेश मस्के यांच्यासह महामार्ग पोलीस खयामोद्दीन खतीब, राजाराम कदम, कैलास आडे, सह जगतगुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्य महाराज यांच्या प्रेरणे अपघातग्रस्त रुग्णांसाठी मोफत असलेली रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे जखमींना तात्काळ औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून गंभीर जखमी सर्वांना पुढील उपचारासाठी त्यांना हिंगोली येथे रेफर करण्यात आले.