औंढा नागनाथ कार अपघात

भरधाव कार उतरली रस्त्याच्या खाली सुदैवाने जीवितहानी टळली..

Aundha Nagnath Car Accident: औंढा नागनाथ ते जिंतूर जाणार्‍या मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथील वळण रस्त्यावर जिंतूर कडून औंढा नागनाथ कडे येणारी भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने.

भरधाव कार उतरली रस्त्याच्या खाली सुदैवाने जीवितहानी टळली..

Aundha Nagnath Car Accident

औंढा नागनाथ (Aundha Nagnath Car Accident) : औंढा नागनाथ ते जिंतूर जाणार्‍या मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथील वळण रस्त्यावर जिंतूर कडून औंढा नागनाथ कडे येणारी भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरून सरळ बाजूला असलेल्या शेतात गेली झाली ही घटना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजे दरम्यान घडली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु वाहनाचे नुकसान झाले.

जिंतूर कडून येणारी कार क्रमांक एम एच २४ ए डब्ल्यू ५३९२ या कार वरील वळण रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने (Aundha Nagnath Car Accident) सदरील भरधाव कार रस्त्याखाली उतरून बाजूच्या शेतात जाऊन उभी राहिली यावेळी कारमध्ये दोघेजण होते सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. त्यांची नावे कळू शकली नाहीत. येथील वळण रस्त्यावर अपघाताचे सत्र सुरूच असून येथे दर दोन-तीन दिवसाला अपघाताच्या घटना घडत आहेत.

त्यामुळे येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतीने तो उभारून फलक उभारण्याची आवश्यकता आहे. येथे असलेले चिमेगाव चे पोलीस पाटील शंकर घुगे, अ‍ॅड. मुंजाभाऊ मगर, आत्माराम जायभाय, उमेश नागरे, आकाश गिरी, प्रल्हाद सांगळे अपघातग्रस्तांना मदत करून दुसर्‍या वाहनाद्वारे त्यांना रवाना केले आहे अपघात प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस करण्यात अद्याप नोंद झाली नव्हती.

संबंधित सामग्री

भरधाव कार उतरली रस्त्याखाली पाच जण गंभीर जखमी 

भरधाव कार उतरली रस्त्याखाली पाच जण गंभीर जखमी 

Aundha Nagnath Car Accident: औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर माथा गावाजवळ असलेल्या कृषी महाविद्यालय जवळ औंढा नागनाथ कडून जिंतूर कडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कार वरील चालकाचे नियंत्रण..

Nov 01, 2026