आग्या मोहळाच्या हल्ला

आग्या मोहळाच्या हल्ल्यात हिंगोली न.प. मुख्याधिकारी, नगरसेवक, कर्मचारी जखमी

Agya Mohal Attacks: तालुक्यातील डिग्रस कर्‍हाळे जलशुध्दीकरण केंद्रावर नगर पालिकेचे पथक पाहणी करीता गेले होते. आग्या मोहळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्यात मुख्याधिकारी, नगरसेवक, कर्मचारी जखमी

आग्या मोहळाच्या हल्ल्यात हिंगोली न.प. मुख्याधिकारी, नगरसेवक, कर्मचारी जखमी

Agya Mohal Attacks

 

डिग्रस कर्‍हाळे जलशुध्दीकरण केंद्राजवळील घटना; लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार

हिंगोली (Agya Mohal Attacks) : तालुक्यातील डिग्रस कर्‍हाळे जलशुध्दीकरण केंद्रावर २ नोव्हेंबरला नगर पालिकेचे पथक पाहणी करीता गेले होते. याचवेळी आग्या मोहळाच्या मधमाशांनी केलेल्या हल्यात मुख्याधिकारी, नगरसेवक, कर्मचारी जखमी झाल्याने त्यांच्यावर हिंगोलीतील लक्ष्मीलाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. 

दिवाळी अवघ्या तोंडावर आली आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत चालू रहावा यासाठी मुख्याधिकारी प्रांजली मुंढे, गटनेते श्रीराम बांगर, नगरसेवक आमेर अली, विशाल गोटरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, कंत्राटदार मयुर कयाल यांच्यासह काहीजण डिग्रस कर्‍हाळे जलशुध्दीकरण केंद्राच्या पाहणी करीता २ नोव्हेंबर सोमवार रोजी गेले होते. सायंकाळी ५ वाजता अचानक त्या ठिकाणी असलेल्या आग्या मोहळाच्या मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने एकच धावपळ सुरू झाली.

यामध्ये मुख्याधिकारी प्रांजली मुंढे यांच्यासह नगरसेवक आमेर अली, विशाल गोटरे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, संगणक अभियंता रामेश्वर चाटे, राहुल बांगर,  कान्हा खंडेलवाल, सुधांशू सिंग,  यांच्यासह इतर काही जण जखमी झाले. त्यांना तात्काळ हिंगोलीतील लक्ष्मी लाईफ केअर हास्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ. अखिल अग्रवाल यांच्यासह डॉ. प्राची अग्रवाल, डॉ. मयुर अग्रवाल, डॉ. विजया अग्रवाल, डॉ. विजय राऊत, डॉ. अविनाश कदम पाटील, डॉ. गजानन मस्के यांनी उपचार केला.

टैग्स: Attacks of Agya Mohal