सेनगाव हिंस्र वन्यप्राणी हल्ला

सेनगाव तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्याचा हल्ला? तीन गायी ठार, एक जखमी

Sengaon Wild Animal Attack: तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील शेतकरी बबन खंडुजी थोरात यांच्या मांगवाडी शिवारातील आखाड्यावर अज्ञात हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे...

सेनगाव तालुक्यात हिंस्र वन्यप्राण्याचा हल्ला? तीन गायी ठार, एक जखमी

Sengaon Wild Animal Attack

 

ब्रह्मवाडीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान; मांगवाडी शिवारातील घटनेने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

सेनगाव (Sengaon Wild Animal Attack) : तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील शेतकरी बबन खंडुजी थोरात यांच्या मांगवाडी शिवारातील आखाड्यावर अज्ञात हिंस्र वन्यप्राण्याने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तीन गायींचा मृत्यू झाला असून एक गाय गंभीर जखमी झाली आहे. तर आणखी एक गाय पळून गेल्याची माहिती आहे. शनिवारी ता. २४ रात्री घडलेल्या या घटनेमुळे शेतशिवारात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी ता.२५ रोजी सकाळी शेतकऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. पोलिस पाटील कानबाराव बिरगड यांनी घटनेची माहिती प्रशासनाला दिली. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास वनविभागाचे कर्मचारी राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (Sengaon Wild Animal Attack) घटनेची माहिती मिळताच शिवसेना उबठा गटाचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

मृत तीन गायींच्या गळ्याचा आणि स्तनाजवळील भागातील मांस अज्ञात हिंस्र प्राण्याने फाडल्याचे निदर्शनास आले आहे. आणखी (Sengaon Wild Animal Attack) एका गायीच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. हल्ला नेमक्या कोणत्या वन्यप्राण्याने केला, याबाबत अद्याप अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. मात्र, परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या चर्चेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान, गुरुवारी ता.२२ रोजी सेनगाव-तळणी मार्गावरील परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर दोन दिवसांतच ब्रम्हवाडी शिवारात गायींच्या मृत्यूची घटना घडल्याने या घटनांचा परस्परांशी संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. गायींवर बिबट्याने हल्ला केल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू असली, तरी वन्यप्राण्याची ओळख अधिकृतरीत्या स्पष्ट झालेली नाही.

आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत पशुधनाची हानी झाल्याने बबन थोरात यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. शेतीसोबत पशुधनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी गायींचा मृत्यू हा मोठा आर्थिक फटका आहे.

शेतशिवारातील आखाड्यांवर वास्तव्य करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना आता रात्रीच्या वेळी सुरक्षिततेची चिंता सतावत आहे. वनविभागाने परिसरातील वन्यप्राण्यांच्या हालचालींचा शोध घेऊन आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे. तसेच (Sengaon Wild Animal Attack) मृत जनावरांच्या नुकसानीचे नियमानुसार मूल्यांकन करून संबंधित शेतकऱ्याला मदत मिळावी, अशी मागणीही पुढे येत आहे. वन्यप्राण्याचा वावर आहे की हल्ल्यामागे अन्य कारण आहे, हे वनविभागाच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

सेनगाव तालुक्यात विजेच्या लपंडावाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वझर उपकेंद्रात घडली थरारक घटना

सेनगाव तालुक्यात विजेच्या लपंडावाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न; वझर उपकेंद्रात घडली थरारक घटना

Sengaon taluka power shortage: सेनगाव तालुक्यातील पूर्णा नदी पात्राजवळील पाच गावांमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या तीव्र वीजटंचाईमुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.

Nov 13, 2026
सेनगाव तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

सेनगाव तहसील कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

Sengaon Congress Protest March: शेतकरी, कष्टकरी, महिला बचत गट आणि सर्वसामान्य जनतेच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी सेनगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी २७ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय

Oct 27, 2026
सेनगाव तालुक्यात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात ३ गायी ठार, १ जखमी

सेनगाव तालुक्यात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात ३ गायी ठार, १ जखमी

Sengaon Wild Animal Attack: तालुक्यातील ब्रह्मवाडी येथील मांगवाडी शिवारातील आखाड्यावर अज्ञात हिंस्र वन्यप्राण्याने केलेल्या भीषण हल्ल्यात तीन गायी जागीच ठार झाल्या असून एक गाय गंभीर जखमी झाली आहे.

Oct 26, 2026
सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

सेनगाव तालुक्यात पकडले अवैध रेतीचे दोन टिप्पर

Sengaon Illegal Sand Mining: सेनगाव तालुक्यात अवैध रेती उत्खनन प्रकरणी पोलिसांनी दोन टिप्पर पकडून गुन्हे दाखल केले.  सेनगाव तालुक्यातील पाटोदा संत सेवालाल महाराज चौक व म्हाळसापूर शिवारामध्ये...

Sep 06, 2026