Animal Theft

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा मानोरा पोलिसांकडून पर्दाफाश!

मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे.

आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा मानोरा पोलिसांकडून पर्दाफाश!

Animal Theft

चार आरोपी अटकेत; ५ बकऱ्यांसह ७ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त

मानोरा : मानोरा पोलिसांनी आंतरजिल्हा जनावर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीच्या ५ बकऱ्या तसेच गुन्ह्यात वापरलेली सुझुकी इर्टिगा कार असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मानोरा पोलीस ठाण्यात बकरी चोरीचे दोन गुन्हे दाखल झाले होते. ग्राम पारवा येथील गुन्ह्याच्या ठिकाणाहून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या सुझुकी इर्टिगा कारचा शोध सुरू केला. तपासादरम्यान ही कार ब्राम्हणगाव, ता. पुसद येथील सतीष भारत श्रृंगारे (वय २९) याच्याकडे असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी सतीष श्रृंगारे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची नावे सांगितली. त्यानंतर करण विनोद राठोड (वय २३), प्रथमेश दिलीप पवार (वय २२) आणि तुषार किशोर जाधव (वय १९), सर्व रा. ब्राम्हणगाव, ता. पुसद, जि. यवतमाळ यांना अटक करण्यात आली.

प्रथमेश पवार याच्या घरझडतीत ५ बकऱ्या आढळून आल्या. चौकशीत त्यापैकी तीन बकऱ्या देउरवाडी येथून, तर दोन बकऱ्या पारवा येथून चोरी केल्याची माहिती समोर आली.

पोलिसांनी एकूण ५ बकऱ्या, किंमत अंदाजे ४९ हजार रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली एमएच २९ सीजे ०९३८ क्रमांकाची इर्टिगा कार, किंमत अंदाजे ७ लाख रुपये, असा एकूण ७ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींनी आणखी जनावर चोरीचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्यांची चौकशी व पुढील तपास सुरू आहे. नागरिकांची जनावरे चोरीस गेली असल्यास त्यांनी मानोरा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलीस अधीक्षक लता फड आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानोरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक नैना पोहेकर व त्यांच्या पथकाने केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि दिनकर राठोड करीत आहेत.

संबंधित सामग्री

कासारशिरसी पोलिसांची अवैध सावकारीविरुद्ध मोठी कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

कासारशिरसी पोलिसांची अवैध सावकारीविरुद्ध मोठी कारवाई; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

Police action in Kasarshirsi: वैध सावकारी परवाना नसताना नागरिकांच्या शेती व घरांच्या मालमत्तांशी संबंधित व्यवहार करून अवैध सावकारी व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध निलंगा तालुक्यातील कासारशिरसी पोलिस...

Nov 13, 2026
स्टेट बँक शाखा मानोराला कायमस्वरूपी क्षेत्र अधिकारी द्या! 

स्टेट बँक शाखा मानोराला कायमस्वरूपी क्षेत्र अधिकारी द्या! 

SBI Manora Branch: भारतीय स्टेट बँक शाखा मानोरा ही  तालुक्यातील सर्वात मोठी बँक शाखा असून, या शाखेला सुमारे ९० गावांतील शेतकरी, व्यापारी, खातेधारक जोडलेले आहेत. मात्र या शाखेला कायमस्वरूपी क्षेत्र...

Nov 13, 2026
नागपूर महापालिकेत ACB चा छापा! जमाबंदी रेकॉर्डसाठी १ हजारांची लाच घेताना टॅक्स कलेक्टर रंगेहात पकडला

नागपूर महापालिकेत ACB चा छापा! जमाबंदी रेकॉर्डसाठी १ हजारांची लाच घेताना टॅक्स कलेक्टर रंगेहात पकडला

नागपूर महापालिकेचा टॅक्स कलेक्टर गौरव वानखेडे याला जमाबंदी रेकॉर्डच्या माहितीसाठी १ हजारांची लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले.

Nov 13, 2026
अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; 7 कोटींच्या खंडणीची मागणी

अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; 7 कोटींच्या खंडणीची मागणी

Threat to Arvind Kejriwal: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल तसेच त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देत सात कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार

Nov 12, 2026
मेकअप आर्टिस्ट बनला ड्रग्ज तस्कर! मालाडच्या घरातील पोटमाळ्यावर लपवले ३ कोटींचे कोकेन

मेकअप आर्टिस्ट बनला ड्रग्ज तस्कर! मालाडच्या घरातील पोटमाळ्यावर लपवले ३ कोटींचे कोकेन

मुंबईत मेकअप आर्टिस्टकडून ३ कोटींचे कोकेन जप्त! मालाडमधील घराच्या पोटमाळ्यावर लपवला होता ६७८ ग्रॅमचा साठा; बांगूरनगर पोलिसांची कारवाई.

Nov 12, 2026