गुप्ता फ्लोअरमध्ये घडलेल्या दुर्भाग्यकारक घटनेत, ५४ लाखांचा आर्थिक द्रव्यांचा उडवला गेला. यात एक आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांना या घटनेच्या पृष्ठभागात असलेल्या अज्ञात माहितीचा तपास करणे महत्त्वाचे ठरले आहे.
अकोला : रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नया जीन-मोहता मिल रोडवरील गुप्ता फ्लोअर अँड ऑइल इंडस्ट्रीजमध्ये व्यापाऱ्याला दोरीने बांधून मारहाण करीत तब्बल ५४ लाख रुपयांचा ऐवज लुटल्याच्या प्रकरणाने अकोला शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे, कारखान्यात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत हमालाचा या कटात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, कारखान्याचे मालक तथा व्यापारी विजय रामकरण गुप्ता हे सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास कारखान्यात आले होते. त्यावेळी गेल्या चार-पाच वर्षांपासून कारखान्यात काम करणारा हमाल तसेच काही दिवसांपूर्वी त्याने सोबत आणलेला एक नवीन सहकारी तेथे उपस्थित होता. सकाळी सुमारे ७.१५ वाजता गुप्ता हे कामगारांना सूचना देण्यासाठी खाली गेले असता, कारखान्याच्या मागील दरवाजातून आणखी एक अज्ञात व्यक्ती आत शिरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर तिघांनी मिळून गुप्ता यांच्यावर हल्ला केल्याचा संशय आहे. आरोपींनी गुप्ता यांचे हात-पाय दोरीने बांधून त्यांना मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत कारखान्यातील तिजोरीची माहिती घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर तिजोरी फोडून तसेच घरून आणलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज घेऊन आरोपी पसार झाल्याची माहिती आहे.
दरोड्याचा कट हमालाने रचला?
कारखान्यात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत कामगाराला व्यापाऱ्याच्या आर्थिक व्यवहारांची व तिजोरीची माहिती असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या दरोड्यामागे अंतर्गत माहितीचा वापर झाला का, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.