Akola Drought

अकोल्यात भीषण पाणीटंचाईचे संकट! महान धरणातील जलसाठा घटला; पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित होणार

अकोला जिल्ह्यात २० वर्षांनंतर पुन्हा पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. महान धरणातील जलसाठा घटल्याने पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर महापालिका कारवाई करणार आहे.

अकोल्यात भीषण पाणीटंचाईचे संकट! महान धरणातील जलसाठा घटला; पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी खंडित होणार

२० वर्षांनंतर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती; सातही तालुक्यांमध्ये पाण्याचे संकट, महापालिकेचा कठोर कारवाईचा इशारा

अकोला : अत्यल्प पावसामुळे अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. गेल्या २० वर्षांनंतर जिल्ह्यात पुन्हा एकदा दुष्काळसदृश परिस्थिती उद्भवली असून, लहान-मोठ्या धरणांमधील जलसाठा वेगाने कमी होत आहे. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महान धरणातील साठाही घटत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, अपव्यय करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे.

दोन दशकांनंतर पुन्हा पाणीटंचाईचे सावट

२०२५ मध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध धरणे आणि तलावांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध होता. मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने जिल्ह्यातील सर्वच जलप्रकल्पांमधील पाण्याची पातळी चिंताजनक झाली आहे. यापूर्वी २००५-०६ मध्येही कमी पावसामुळे जिल्ह्याला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. आता तब्बल दोन दशकांनंतर पुन्हा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये अवकाळी पाऊस झाल्यास जलसाठ्यात काही प्रमाणात वाढ होऊन दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाबाबत अनिश्चितता असल्याने उपलब्ध पाण्याचे नियोजन करणे आणि त्याचा वापर जपून करणे आवश्यक बनले आहे.

पाण्याचा अपव्यय केल्यास नळजोडणी तोडणार

जिल्ह्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन अकोला महानगरपालिकेने पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नळधारकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक नागरिकाला पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे, हा या निर्णयामागील उद्देश आहे.

नळाला तोटी नसणे, तोटी असतानाही पाणी वाया घालवणे, नळाच्या पाण्याचा वापर वाहने किंवा जनावरे धुण्यासाठी करणे तसेच घरातील अंतर्गत जलवाहिनीतील गळती दुरुस्त न करणे, अशा प्रकारांवर महापालिका लक्ष ठेवणार आहे. या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित नळधारकाची नळजोडणी तत्काळ खंडित करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे आणि पाणीबचतीसाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महान धरणातील साठ्यावर प्रशासनाचे लक्ष

अकोला शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी महान धरणातील उपलब्ध जलसाठा आरक्षित ठेवण्यात आला आहे. मात्र, हा साठा सातत्याने कमी होत असल्याने आगामी काळात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याचा वापर योग्य पद्धतीने न झाल्यास पुढील सात ते आठ महिन्यांत महान धरणातील मृत जलसाठ्यातून पाणी उपसण्याची वेळ येऊ शकते.

२००५-०६ मध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईची पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणीबचतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. भविष्यात पाणीटंचाई आणखी तीव्र होऊन नागरिकांवर स्थलांतर करण्याची वेळ येऊ नये, यासाठी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महान धरणातील जलसाठ्यावर कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे आणि बोरगाव मंजूचे उपविभागीय अधिकारी आदित्य कासार यांच्या मार्गदर्शनाखाली महानचे शाखा अभियंता संदीप नेमाडे, वैभव उगले आणि मनोज पाठक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

संबंधित सामग्री

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार? फडणवीसांचे महत्त्वपूर्ण निर्देश

मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटणार? फडणवीसांचे महत्त्वपूर्ण निर्देश

मराठवाडा वॉटर ग्रीडला गती! JICA कडून २० हजार कोटींचे अर्थसहाय्य, पहिल्या टप्प्यात चार जिल्ह्यांना लाभ; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य.

Nov 06, 2026
दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! थकबाकीमुळे बंद केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू होणार

दुष्काळग्रस्तांना मोठा दिलासा! थकबाकीमुळे बंद केलेल्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू होणार

दुष्काळग्रस्तांना दिलासा! थकबाकीमुळे बंद असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा पुन्हा सुरू होणार; ऊर्जा विभागाचा शासन निर्णय जारी.

Oct 31, 2026
परभणीत मेन रायझिंग लाईनच्या व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया!

परभणीत मेन रायझिंग लाईनच्या व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया!

Parbhani Water Supply Crisis: एकीकडे संभाव्य दुष्काळाचे संकट गडद होत असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येलदरी येथून येणाऱ्या मुख्य रायझिंग लाईनवरील व्हॉल्व्हमधून लाखो लिटर पाणी वाया

Oct 29, 2026
शाळा-अंगणवाड्यांना सुरक्षित पाणी मिळणार; आदिवासी वस्त्यांचे प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत

शाळा-अंगणवाड्यांना सुरक्षित पाणी मिळणार; आदिवासी वस्त्यांचे प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत

जल जीवन मिशनअंतर्गत शाळा-अंगणवाड्यांना सुरक्षित पाणीपुरवठा, आदिवासी वस्त्यांचे प्रस्ताव १५ नोव्हेंबरपर्यंत आणि पाण्याच्या गुणवत्तेची नियमित तपासणी करण्याचे निर्देश.

Oct 29, 2026
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी २०५१ पर्यंतचा जलनियोजन आराखडा; तीन महिन्यांत अहवाल सादर होणार

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसाठी २०५१ पर्यंतचा जलनियोजन आराखडा; तीन महिन्यांत अहवाल सादर होणार

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी २०५१ पर्यंतचा जलनियोजन आराखडा तयार होणार. भातसा, बारवीसह जलस्रोत, पाणीटंचाई आणि पर्यायी उपायांचा तीन महिन्यांत अभ्यास.

Oct 27, 2026