कृषी सौर पंप गुन्हा

शेतकरी, शासनाची फसवणूक करणार्‍यावर गुन्हा

Agricultural solar pumps Crime: सेलू येथील सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज भरताना ऑनलाईन सुविधा केंद्र चालकांनी खोटी, बनावट जातप्रमाणपत्र तयार करुन प्रस्ताव दाखल केल्याचा प्रकार पुढे आला आहे.

शेतकरी, शासनाची फसवणूक करणार्‍यावर गुन्हा

Agricultural solar pumps Crime

 

बनावट जात प्रमाणपत्र तयार करुन घेतला कृषी सौर पंपाचा लाभ

परभणी (Agricultural solar pumps Crime) : सेलू येथील सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज भरताना ऑनलाईन सुविधा केंद्र चालकांनी खोटी, बनावट जातप्रमाणपत्र तयार करुन प्रस्ताव दाखल केल्याचा प्रकार पुढे आला आहे. शासनाची व शेतकर्‍यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी तीन जणांवर १ नोव्हेंबरला सेलू पोलिसात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २७ मे ते २ सप्टेंबर २०२६ या दरम्यान घडला. 

महावितरणचे उप कार्यकारी अभियंता नागनाथ गोविंदअप्पा शंकरवार यांनी फिर्याद दिली आहे. कृषी सौर पंप योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावे लागतात. यासाठी जातीच्या प्रमाणपत्रासोबत इतर महात्वाची प्रमाणपत्र स्कॅन करुन अर्जासोबत अपलोड केली जातात. सर्व तपासणी केल्यावर पात्र लाभार्थ्याला पंप दिला जातो. सेलू उप विभाग अंतर्गत येणार्‍या निवळी बु., बोरकिनी, आडगाव दराडे, कुपटा, कनेरवाडी, वालूर या गावातील लाभार्थी २४ शेतकर्‍यांनी विविध ऑनलाईन केंद्राकडून अर्ज सादर केले होते.

या अर्जाची तपासणी केल्यावर  ११ अर्ज रद्द  करण्यात आले. सदर अर्जासोबत लाभार्थ्यांनी दिलेले जात प्रमाणपत्र चुकीच्या असल्याचे निदर्शनास आले. ऑनलाईन सुविधा केंद्र चालकांनी शासन, शेतकर्‍यांची फसवणूक केली. सदर प्रकरणात सेलू पोलीस ठाण्यात चौकशीसाठी तक्रार अर्ज देण्यात आला. संबंधितांनी शेतकर्‍यांचा विश्वास घात करुन त्यांच्या नावे एससी, एसटी प्रवर्गाचे बनावट जातीचे प्रमाणपत्र तयार करत शेतकर्‍यांच्या नावाने ऑनलाईन पध्दतीने मागेल  त्याला सौरपंप योजनेंतर्गत खोटी बनावट जात प्रमाणपत्र, संबंधित कागदपत्र सादर करुन शासनाची फसवणूक केली. या प्रकरणी ऑनलाईन सेतू सुविधा केंद्र चालक रवि डंबाळे, कृष्णा श्रीरंग हरकळ, करण बाबासाहेब शिंदे यांच्यावर सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.