कळमनुरी (Illegal liquor transport Action) : शहरातील एका धाब्यासमोर मसोड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक यांना मिळतात. त्यांनी तात्काळ सापळा रचून अवैध दारूची वाहतूक करणारे स्कुटी चालकाला पकडले त्यांचे कडून जवळपास एक लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की कळमनुरी शहरातील काय अंतरावर एका धाब्यासमोर समोर दिनांक 27 ऑक्टोबर चे रात्री सुमारे आठ वाजता देशी दारूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक यांना मिळतात त्यांनी आपले पथकासह जाऊन सदर स्कुटीला अडून तपासणी केल्या असता स्कुटी व मध्ये तीन देशाचे बॉक्समध्ये १४४ बॉटल आढळून आले. या (Illegal liquor transport Action) प्रकरणी पोलिसांनी स्कुटी चालक कैलास टाले यांना अटक करून एक लाख 11 हजार 540 रुपयाचे मुद्देमाल जप्त केले. याची फिर्याद पोलीस उपाधीक्षक मयूर रसाळ यांनी दिल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची पुढील तपास पोलीस जमादार दिलीप पोले हे करीत आहे.
अवैध दारू वाहतुक कारवाई
कळमनुरीत अवैध दारू वाहतुकीवर कारवाई; १.११ लाखांचा मुद्देमाल जप्त
Illegal liquor transport Action: शहरातील एका धाब्यासमोर मसोड फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर अवैधरीत्या देशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक यांना मिळतात. त्यांनी तात्काळ सापळा..
By :
देशोन्नती वृत्तसंकलन »
•
Illegal liquor transport Action