Yuva Sena Sanghatan: युवा सेना पदाधिकारी यांची आढावा बैठक युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा मराठवाडा विभागीय निरीक्षक विपुल पिंगळे व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत
हिंगोली (Yuva Sena Sanghatan) : येथे युवा सेना पदाधिकारी यांची आढावा बैठक 23 मार्च रोजी युवा सेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा मराठवाडा विभागीय निरीक्षक विपुल पिंगळे व युवा सेना जिल्हाप्रमुख राम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

या (Yuva Sena Sanghatan) बैठकीमध्ये आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुका गाव तिथे शाखा युवा सेना विस्तार साठी मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे युवा सेना जिल्हा प्रमुख राम कदम यांनी मार्गदर्शन केले. या वेळी युवा सेना लोकसभा अध्यक्ष दत्ता माने, जिल्हा संघटक संदीप मोरे, उपजिल्हा प्रमुख मयूर शिंदे, कळमनुरी विधानसभा अध्यक्ष वैभव (आर आर) चौधरी पाटील, सचिन पेंढारकर तालुका अध्यक्ष कळमनुरी, शिवम नाईक तालुका अध्यक्ष कळमनुरी, विजय देशमुख तालुका अध्यक्ष औंढा, बंटी उर्फ परमेश्वर जाधव शहर प्रमुख कळमनुरी, शंकर सावळे हिंगोली विधानसभा अध्यक्ष, विजय शिंदे तालुका अध्यक्ष हिंगोली, विशाल देशमुख शहर प्रमुख हिंगोली, अशोक इंगळे तालुका अध्यक्ष सेनगाव, व्यंकटेश कऱ्हाळे उपजिल्हा प्रमुख वसमत, शिवराज यशवंते तालुका अध्यक्ष वसमत, विशाल ढोरे तालुका अध्यक्ष वसमत, विनायक सातपुते शहर अध्यक्ष वसमत, दिपक इंगोले विधानसभा अध्यक्ष वसमत, संतोष गोरे प स हिंगोली, कपिल शेवाळे माजी उपसरपंच कारवाडी व असंख्य (Yuva Sena Sanghatan) युवा सेना पदाधिकारी कार्यकर्ते या बैठकीस उपस्थित होते.