Youth suicide: युवकने नैराश्यामुळे भोवतीच्या छतावरून आत्महत्या करून मृत्यू होण्याची घटना झाली. अपेक्षित यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल
औंढा नागनाथ तालुक्यातील रूपूर येथील दुर्दैवी घटना
औंढा नागनाथ (Youth suicide) : तालुक्यातील रुपूर येथील अर्जुन शिवाजी गीते (२४) या नोकरी भरतीची तयारी करणार्या युवकाने नैराश्यातून घरातील छताच्या हुकाला सुताच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना ५ जुलै रविवार रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
घटनेची माहिती ग्रामस्थांनी औंढा नागनाथ पोलिसांना कळविली.यानंतर पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक अमोल इंगोले, जमादार रविकांत हरकळ तसेच पोलीस कर्मचारी किशोर पारिसकर आणि अभिजीत कोळेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला आणि उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह (Youth suicide) अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
अर्जुन गीते यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. मागील काही महिन्यांपासून ते विविध नोकरी भरती परीक्षांची तयारी करत होते. मात्र, अपेक्षित यश मिळत नसल्याने आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे रुपूर गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.