महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची विस्तारित प्रदेश कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली.
अभिषेक धवड यांच्या निवडीने कार्यकर्त्यांत आनंदाची लाट
नागपूर (Youth Congress) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची विस्तारित प्रदेश कार्यकारिणी मंगळवारी जाहीर करण्यात आली. या प्रदेश कार्यकारिणीत सरचिटणीसपदी अभिषेक अशोक धवड यांची वर्णी लागली आहे. अभिषेक धवड यांचे युवकांमध्ये चांगले कार्य आहे. पक्षाचे धोरण राबवून समाजात काम करण्यात ते अग्रेसर असल्याचे मानले जाते. त्यांचे वडील माजी आमदार अशोक धवड यांचा त्यांना राजकीय वारसा लाभला आहे. अभिषेक धवड यांच्या प्रदेश सरचिटणीसपदी निवडीबद्दल युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.