Breaking News
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
  • रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
  • धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा
  • फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे
  • सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी
  • पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
  • बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान
  • पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक;पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद
  • धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

घोट युवक हल्ला

उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून युवकावर हल्ला; घोट येथे गुन्हा दाखल…

Ghot youth attack: घोट येथे एक युवक शैलेश विजय नखाते यांनी आरोपी संतोष रघुनाथ राऊत यास पैसे मागितल्यावर हल्ला करून गंभीर दुखापत केली. गुन्हा भारतीय न्याय संहिता


उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरून युवकावर हल्ला घोट येथे गुन्हा दाखल…

Ghot youth attack |

घोट (Ghot youth attack) : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे दोन मित्रामध्ये उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन मित्राने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी घोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शैलेश विजय नखाते (वय ३२, रा. घोट) यांनी आरोपी संतोष रघुनाथ राऊत (वय ३०, रा. घोट) यास पूर्वी उसने दिलेले ५० रुपये मागितले होते. याच कारणावरून आरोपीने संतापून फिर्यादीस शिवीगाळ करत हाताने काठीने मारहाण  करून गंभीर दुखापत केल्याचे घटना घडली  तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना १८ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास मौजा घोट येथे घडली.

जखमीवर वैद्यकीय उपचार करण्यात आले असून (Ghot youth attack) वैद्यकीय अहवालाच्या आधारे घोट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीला चामोर्शी न्यायालयात हजर केले असता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सदर प्रकरणाचा पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनात तपास पोलीस उपनिरीक्षक जया शेळके करीत आहेत.

Related to this topic: