Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

गीर्यारोहक निपुण अग्रवाल

हिंगोलीच्या १३ वर्षीय निपुण अग्रवालने सर केले एव्हरेस्ट बेस कॅम्प

Mountaineer Nipun Aggarwal: १३ वर्षीय निपुण अग्रवालने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर यशस्वी गिरीरोहण केले, त्याने मराठवाड्यातील सर्वात कमी वयाचा गीर्यारोहक म्हणून इतिहास रचला.


हिंगोलीच्या १३ वर्षीय निपुण अग्रवालने सर केले एव्हरेस्ट बेस कॅम्प

Mountaineer Nipun Aggarwal |

 

मराठवाड्यातील सर्वात कमी वयाचा गिर्यारोहक;१३ व्या  वर्षीच गाठला टप्पा

हिंगोली (Mountaineer Nipun Aggarwal) : जिद्द, मेहनत आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हिंगोलीच्या निपुण अनुप निकिता अग्रवाल या १३ वर्षीय मुलाने २४ मे २०२६ रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्प (Eँण्) यशस्वीरित्या सर केला आहे. ५,३६४ मीटर / १७,५९८ फूट उंचीवर, जिथे हवेत केवळ ५०टक्के ऑक्सिजन असतो, अशा जगातील सर्वात खडतर ट्रेक्सपैकी एक असलेल्या मोहिमेत निपुणने इतिहास रचला. या कामगिरीसह निपुणच्या नावे अनेक विक्रम नोंदवले गेले आहेत. मराठवाड्यातून इबीसी गाठणारा सर्वात कमी वयाचा व्यक्ती म्हणून निपुन अग्रवालची ओळख  सर्वदुर झाली  आहे.५,३६४ मीटर उंची गाठणारा अग्रवाल कुटुंबातील सर्वात कमी वयाचा सुपुत्र आहे.हिंगोली जिल्ह्यातून एवढ्या कमी वयात इबीसी गाठणारा पहिला भूमिपुत्र ठरला आहे.

गेल्या एक वर्षापासून निपुणने या मोहिमेसाठी अथक परिश्रम घेतले. पहाटे लवकर उठून केलेला सराव, कडक शिस्त आणि जिद्द याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले. बेस कॅम्पवर भारताचा तिरंगा छातीवर लावून उभ्या असलेल्या निपुणचा फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

निपुणचे  (Mountaineer Nipun Aggarwal) आजोबा अ‍ॅड. आर. एन. अग्रवाल आणि आजी सरोज अग्रवाल यांनी आनंद व्यक्त करताना सांगितले, 'आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी हा अभिमानाचा आणि कृतज्ञतेचा क्षण आहे. निपुणने वयाच्या १३व्या वर्षीच एक मोठा टप्पा गाठला आहे. त्याने दाखवून दिले की वय हे केवळ एक आकडा आहे आणि दृढनिश्चय असेल तर काहीही अशक्य नाही. निपुणच्या या यशामुळे हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related to this topic: