Godavari River Youth Death: गुरुवारी सकाळी गंगाखेडत झालेल्या घटनेत २० वर्षाचा धनगर गल्लीचा युवक पाण्यात बुडून मृत्यू होण्याची शक्यता तपासली जात आहे. त्याच्या आईने आरडावे आले
गंगाखेड शहराजवळील घटना; अकस्मात मृत्यूची नोंद...!
परभणी (Godavari River Youth Death) : गंगाखेड येथे धारखेड पुलाखाली गोदावरी नदी पात्रात बुडून एका २० वर्षीय युवकाचा मृत्यु झाला. ही घटना गुरुवार १८ जून रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असुन गंगाखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
शहरातील धनगर गल्ली येथील राधाजी बळीराम शिंदे वय २० वर्ष हा युवक गुरुवार १८ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्याच्या आईसोबत कपडे धुण्यासाठी गोदावरी नदीवर गेला होता. येथे असलेल्या नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीजवळ पोहत असतांना हा (Godavari River Youth Death) युवक पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याच्या आईने आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून हबीब बेग, रमेश भोई आदींसह बहुसंख्य पोहणार्या तरुणांनी नदी पात्रात उडी घेत शोध सुरु केला. तब्बल दिड तासानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यास पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले.
गोदावरी नदी पात्रात एक युवक बुडाल्याची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक युसूफ खान पठाण, पोह संतोष व्यवहारे यांनी ही घटनास्थळी धाव घेत त्यास खाजगी रुग्णवाहिका चालक रावण भालेराव व हनुमान इंगळे यांच्या मदतीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उद्धव शिंदे यांनी दिलेल्या माहितीवरून (Godavari River Youth Death) अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याचा पुढील तपास पोह संतोष व्यवहारे, पो.शि. राम पडघन हे करीत आहेत.