Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

येलदरी धरण पूल

यंत्रणेच्या सुस्त कारभाराला जिल्हाधिकार्‍यांचा चाप; येलदरी पुलासाठी 'अ‍ॅक्शन प्लॅन'चे आदेश

Yeldari Dam Bridge: येलदरी पुलाच्या कामातील अनास्थेमुळे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कडक उपाय योजना आणि डेडलाईन निश्चित केली.


यंत्रणेच्या सुस्त कारभाराला जिल्हाधिकार्‍यांचा चाप येलदरी पुलासाठी अ‍ॅक्शन प्लॅनचे आदेश

Yeldari Dam Bridge |

सेनगाव (Yeldari Dam Bridge) : मराठवाड्याच्या मातीवर अभियांत्रिकीचा एक आधुनिक चमत्कार म्हणून ओळखला जाणारा येलदरी धरणावरील 'केबल-स्टेड' पूल सध्या प्रशासकीय अनास्थेच्या कात्रीत अडकला आहे. मुंबईच्या सी-लिंकची आठवण करून देणारा हा भव्य प्रकल्प गेल्या वर्षभरापासून केवळ 'अप्रोच रोड'साठी धूळ खात पडला आहे. मात्र, रविवारी १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करत अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. 'रखडलेले काम किती दिवसात पूर्ण करणार याची डेडलाईन द्या,' अशा कडक शब्दांत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुनावल्याने आता या पुलाचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

येलदरी धरणा (Yeldari Dam Bridge) जवळ १९६० च्या दशकात उभारलेला जुना दगडी पूल सध्या जीर्ण झाला असून तो वाहतुकीचा भार पेलण्यास असमर्थ ठरत आहे. एका बाजूने वाहन आले की दुसर्‍या बाजूला वाहनांच्या रांगा लागतात. तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात यामुळे या पुलाला स्थानिक नागरिक 'मृत्यूचा सापळा' म्हणू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या पुलाची निकड असतानाही तो वापराविना उभा असल्याने जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.येलदरीच्या बॅकवॉटरवर उभारलेला हा नवा पूल स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.१४ हाय-टेन्शन केबल्सवर तोललेला 'एक्स्ट्रा डोज्ड' डिझाइनचा पूल.१८.५० मीटर रुंदी, रात्रीची विद्युत रोषणाई पर्यटनाला चालना देणारी ठरेल.

मात्र, (Yeldari Dam Bridge) पुलाचे मुख्य काम पूर्ण होऊनही त्याला जोडणारा रस्ता अपूर्ण असल्याने कोट्यवधींचा हा प्रकल्प केवळ एक 'शो-पीस' ठरत आहे.  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी उपविभागीय अधिकारी समाधान घटुकडे,  तहसीलदार सखाराम मांडवगडे यांच्यासह पुलाची पाहणी केली. यंत्रणांच्या समन्वयाअभावी महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडणे हे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथगतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी तात्काळ अ‍ॅक्शन प्लॅन' सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकार्‍या ंच्या या आक्रमक भूमिकेनंतर आता संबंधित विभागाने हालचाली सुरू केल्या असून रखडलेल्या फाईलला गती मिळणार आहे.

हा (Yeldari Dam Bridge) पूल केवळ दळणवळणाचे साधन नसून जिंतूर आणि सेनगाव तालुक्यातील विकासाचे प्रवेशद्वार आहे. मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा व्यापार, शिक्षण आणि आरोग्यासाठी 'जीवनवाहिनी' ठरणार आहे. 'कोट्यवधींचा हा प्रकल्प केवळ कागदोपत्री आणि डोळ्यांच्या सुखासाठी न राहता, तो तातडीने सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू व्हावा, हीच जिल्हा प्रशासनाची प्राथमिकता असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भेट दिल्यानंतर पहावयास मिळाले. दरम्यान, या दौर्‍यात जिल्हाधिकार्‍यांनी  येलदरी धरणातील वीजनिर्मिती प्रकल्प व धरणांची पाहणी केली. आता जिल्हाधिकार्‍यांच्या या दौर्‍यानंतर येलदरीचा हा 'राजेशाही' पूल सर्वसामान्यांच्या चाकांखाली कधी येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: