Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

येडाई यात्रा

येडाईच्या यात्रेत 15 लाखांवर भाविकांनी वेचला चुना!

Yedai Yatra: येडेश्वरी देवीच्या यात्रेत 15 लाखांवर भाविकांनी चुनाविक्री केली. 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.


येडाईच्या यात्रेत 15 लाखांवर भाविकांनी वेचला चुना

Yedai Yatra |

'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने दुमदुमली येरमाळानगरी

भूम (Yedai Yatra) : श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र पोर्णिमा यात्रा महोत्सवास गुरुवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला असून शुक्रवारी यात्रेतील मुख्य सोहळा चुनखडी वेचण्याचा होता. जवळपास 15 लाखांवर भाविकांनी शुक्रवारी येडाईच्या यात्रेत चुना वेचला.

'आई राजा उदे उदे , येडुसरीचा उदे उदे', अशा जयघोषामध्ये येडेश्वरी देवीची पालखी मुख्य मंदिरावरुन स .8 वा निघाली. बाजार चौकात बकाळी 10 वा . पालखीचे आगमन झाल्यानंतर पुष्पहारांनी पालखीचे स्वागत करण्यात आले. (Yedai Yatra) चुन्याच्या रानात स .11 वा पालखीचे आगमन होताच लाखों भाविकांनी चुनखडीचे खडे वेचून पालखीवर टाकत 'आई राजा उदे उदे'चा एकच जयघोष भाविकांनी केला. भाविकांच्या या गजराने चुन्याच्या रानाचा परिसर दुमदुमून गेला होता.

शुक्रवारी सकाळी 8 वा.येडेश्वरी देवीची पालखी डोंगरावरील मंदिरातुन आमराई मंदिराकडे हालगी, जहांज, संबळाच्या गजरात वाजत गाजत निघाली. पुढील पाच दिवस पालखी आमराई मंदिरामध्ये मुक्कामी राहणार आहे. श्री येडेश्वरी देवीच्या मंदिराला यात्रेनंतर पालखी डोंगरावरील मुख्य मंदिरात परत गेल्यानंतर चुन्याने रंगावण्याची पूर्वापार परंपरा चालत आली आहे. त्यामुळे चुना वेचण्याचा कार्यक्रम यात्रेचा मुख्य कार्यक्रम मानला जातो. चुना वेचण्यासाठी यात्रेला येण्याची परंपरा भाविकांच्या पिढ्यान् पिढ्या चालत आलेली प्रथा असल्याने मजूर, शेतमजूर, चाकरमाने कर्मचारी, लहान मोठे व्यावसायिक, व्यापारी, भाविक राज्यभरातून दाखल झाले होते.

पालखी मिरवणुकीसाठी तगडा बंदोबस्त!

श्री येडेश्वरी देवीच्या यात्रेसाठी (Yedai Yatra) पोलीस प्रशासनाने विविध उपाय योजना आखून तगडा बंदोबस्त केला होता. मुख्य मंदिरातून पोलीस प्रशासन, देवस्थान सयंसेवक, स्थानिक ग्रामसुरक्षा दलाच्या संरक्षण कड्यात पालखी निघाल्याने सुरक्षितपणे पालखी मिरवत आली. यावेळी ग्रामपंचायतचे पदाधिकारी, देवस्थानचे पुजारी, मानकरी, खांदेकरी पालखी सोबत होते. पालखीच्या दर्शनासाठी आ. राणाजगजीतसिंह पाटील, आ .कैलास पाटील, अजित पिंगळे उपस्थित होते.

Related to this topic: