स्थानीक शेतकर्यांच्या मदतीने केले रुग्णालयात दाखल
उमरखेड (Wild Boar Attack) : शेतातील ऊसाला पाणी देण्याचे काम करीत असलेल्या युवा शेतकर्यावर अचानक रानडुकराने हल्ला करुण गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील चालगणी शेतशिवारात दिनांक २४ मार्च रोजी सकाळी १० वाजताचे दरम्यान घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या शेतकर्याचे नाव दत्ता भगवान शिन्दे असुन तो आपल्या शेतात ऊस पीकाला पाणी देण्याचे काम करीत होता. परंतु अचानक आलेल्या रानडुकराच्या कळपातील डुकराने सदर शेतकर्यास गंभीर जखमी केले असुन परीसरातील शेतीत जवळच काम करीत असलेल्या इतर शेतकर्याच्या नीदर्शनास रानडुककर हलला करीत असल्याची बाब येताच त्याणी प्रचंड आरडा ओरडा करून जखमी शेतक-यास रानडुक्कराचया तावडीतुन सोडवीले गंभीर दुखापत झाल्याने जखमी शेतकर्यास स्थानीक नागरीकाच्या मदतीने तात्काळ उमरखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे .
परीसरात वन्यप्राण्यानी धुमाकुळ घातला असुन पीकाच्या नासाडी सह मानवी जीवाला इजा पोहचविण्याच्या घटनात सातत्याने वाढ होत असल्याने शेतकर्यात भीतीचे वातावरण नीर्माण झाले असुन वनवीभागाने उच्छाद मांडनार्या वन्य प्राण्यांचा तात्काळ बंदोबस्त करून घटनेत जखमी झालेल्या शेतकर्यास भरीव अर्थिक मदत द्यावी अशी मागणी पुढे येत आहे .