Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

महिला रानडुकर हल्ला

शेतात काम करणार्‍या महिलेवर रानडुकराचा हल्ला; कुत्र्याच्या धाडसाने वाचला जीव

Wild Boar Attack: शेतकरी अन्नपूर्णा चव्हाण यांचा रानडुकराचा अचानक हल्ल्यात जिवाची बचत कुतर्या धाडसाने झाली. तिची गंभीर जखमांवर उपचार सुरू आहेत.


शेतात काम करणार्‍या महिलेवर रानडुकराचा हल्ला कुत्र्याच्या धाडसाने वाचला जीव

Wild Boar Attack |

हिंगोली (Wild Boar Attack) : जिल्ह्यातील मौजे वडचुना येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून, एका कुत्र्याच्या धाडसामुळे तिचा जीव थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वडचुना येथील रहिवासी अन्नपूर्णा गजानन चव्हाण या आपल्या शेतात नेहमीप्रमाणे शेतीची कामे करत होत्या. याच वेळी अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांच्या पायावर, कमरेवर तसेच शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा झाल्या. हल्ला सुरू असतानाच परिसरातील एका कुत्र्याने मोठ्याने भुंकत रानडुकरावर धाव घेतली. त्यामुळे रानडुकराने तेथून पळ काढला आणि महिलेचा जीव वाचला. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेऊन जखमी अन्नपूर्णा चव्हाण यांना उपचारासाठी हिंगोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे.

या (Wild Boar Attack) घटनेमुळे वडचुना परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात रानडुकरांचा वाढता वावर लक्षात घेता वन विभागाने तातडीने उपाययोजना करून शेतकर्‍यांच्या सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी, तसेच रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.