तालुक्यातील वडगाव येथे आलेल्या वादळी वाऱ्याने एका लग्न मंडपावर दि. ७ मे रोजी गावात ग्राम पंचायतने बसविलेले सोलर खांब विद्युत तारावर कोसळून पडले.
४ जण जखमी, तर २ महीला गंभीर जखमी!
मानोरा (Wedding Accident): तालुक्यातील वडगाव येथे आलेल्या वादळी वाऱ्याने एका लग्न मंडपावर दि. ७ मे रोजी गावात ग्राम पंचायतने बसविलेले सोलर खांब विद्युत तारावर कोसळून पडल्याने विद्युत तारामुळे ४ जण जखमी झाले असुन यामध्ये सोलर खांब अंगावर पडल्याने २ महीला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असुन अनेक जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर असे की, गुरुवार रोजी सकाळपासूनच आभाळ दाटून आले होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. अशातच वादळी वाऱ्याने वडगाव येथे लग्न मंडपावर ग्राम पंचायत प्रशासनाने बसविलेले सोलर खांब विद्युत तारावर पडल्याने विद्युत तारामुळे ४ जण जखमी झाले असुन सोलर खांब लग्न मंडपात कोसळून पडल्याने २ महीला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलाना उपचारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.