Palasgaon Aggressive Andolan: पळसगाव येथील तीव्र पाणी टंचाईमुळे ग्रामस्थ असंतोषात आले. तरुणांनी ग्रामपंचायत शेजारी असलेल्या टावरवर आक्रमक आंदोलन केले. जलजीवन मिशनच्या कामाचे निकृष्ट दर्जा
वसमत तालुक्यातील पळसगाव येथे पाणी टंचाईमुळे ग्रामस्थात असंतोष
वसमत (Palasgaon Aggressive Andolan) : तालुक्यातील पळसगाव येथील तीव्र पाणीटंचाई मुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शुक्रवारी ग्रामसभा होती. त्यामुळे सर्व ग्रामस्थ व तरुणांनी पाणीटंचाईच्या समस्येवर प्रशासनाला धारेवर धरले गावातील काही तरुण मंडळी आक्रमक आंदोलन करत ग्रामपंचायत शेजारी असलेल्या टावरवर चढले. काहीजणांनी झाडावर चढून आक्रमक आंदोलन केले. जल जीवन मिशन योजनेच्या चौकशीची करण्याची मागणी करण्यात आली आक्रमक आंदोलनामुळे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पोलीस अधिकारी गावात दाखल झाले. त्यांनी चर्चा करून त्यातून तात्काळ मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने तरुणांनी आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे.
वसमत तालुक्यातील पळसगाव येथे (Palasgaon Aggressive Andolan) तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे गावात जल जीवन योजनेचे काम झालेले आहे. पाईपलाईन गावात टाकण्यात आलेली आहे. मात्र अद्याप त्याला पाणी नाही योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे या योजनेच्या कामाची चौकशी करण्याचीही मागणी आहे मात्र चौकशी होत नाही.
या (Palasgaon Aggressive Andolan) उन्हाळ्यात गावातील एकही हातपंपाला पाणी नाही जलजीवन योजनेचे पाणी मिळत नाही हातपंप विहिरी बोअर आटलेले आहेत. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागत आहे. पंचायत समिती स्तरावरून पळसगाव येथील पाणीटंचाईची कोणतीही दखल घेतली जात नाही. बीडीओ, ग्रामविकास अधिकारी याकडे पाहायला तयार नाहीत पाणीटंचाई असल्यामुळे टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी सरपंचांनी केली होती. त्या मागणीला बिडिओ व पंचायत समिती स्तरावरून प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळेही पाणीटंचाईची समस्येत भर पडली व ग्रामस्थांमध्ये संताप वाढत गेला.
शुक्रवारी पळसगाव येथे ग्रामसभा होती ग्रामसभेच्या निमित्ताने ग्रामस्थ एकत्र जमले होते. यावेळी (Palasgaon Aggressive Andolan) पाणीटंचाईचा मुद्दा मांडण्यात आला. पाणीटंचाईसाठी तात्काळ उपायोजना करावी, अशी मागणी पुढे आली. यावेळी गावातील काही तरुणांनी ग्रामपंचायत शेजारी असलेल्या टावर वर चढून आक्रमक आंदोलन केले तर काहीजण झाडावर चढून आंदोलन करत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून गटविकास अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी तोटावाड यांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला यावेळी तरुणांनी जलजीवन योजनेमध्ये असलेला भ्रष्टाचार त्याची चौकशी करावी व तात्काळ पाणीपुरवठा गावाला होईल यासाठी उपाय योजना कराव्यात अशी मागणी केली. यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ उपायोजना करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी तरुणांनी मागणीची निवेदन अधिकाऱ्यांना दिले. पाण्यासाठी पळसगाव येथे झालेल्या उग्र आंदोलनामुळे खळबळ उडालेली आहे.
या संदर्भात पळसगावचे सरपंच संभाजी डाखोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पळसगाव येथे (Palasgaon Aggressive Andolan) तीव्र पाणीटंचाई आहे जलजीवन मिशनचे काम अर्धवट झाली आहे त्यामुळे पाणी टंचाईच्या समस्येत भर पडली आहे. पाणीटंचाईमुळे पंचायत समितीकडे टँकरची मागणी केलेली आहे. मात्र अधिकारी जल जीवन मिशनमुळे टँकर देता येत नाही असे कारण सांगत आहेत त्यातून पाणीटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. पाणीटंचाईच्या समस्येमुळे ग्रामस्थ व तरुण आक्रमक झाले व त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन केले. गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ उपायोजना करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. आमदार निधीतून मंजूर झालेले दोन हातपंप तात्काळ घेण्यात येणार असल्याचे आणि योजनेचे रिवाईस इस्टिमेट केले असल्याचेही सरपंच संभाजी डाखोरे यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.