Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

स्कूल बस अपघात

साई इंग्लिश स्कूल बसच्या धडकेत वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू

School bus accident: वारंगा फाटा येथे साई इंग्लिश स्कूलच्या बसने वृद्ध रामराव कपाळे यांना उडवून त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग 361 वरील घटना घडली.


साई इंग्लिश स्कूल बसच्या धडकेत वयोवृद्ध व्यक्तीचा मृत्यू

School bus accident |

वारंगा फाटा (School bus accident) : येथील वारंगा फाटा साई इंग्लिश स्कूल बसची वयोवृद्ध इसमाला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी अवस्थेत नांदेड येथे रुणवाहिकेद्वारे उपचारासाठी नेत असताना वयोवृध्द इसमाचा रस्त्यातच मृत्यू झाला.

सविस्तर वर्त असे की ही घटना 4 एप्रिल रोजी 12.30 सुमारास राष्ट्रीय महामार्ग 361 वर वारंगा फाटा शिवारात साई इंग्लिश स्कूलच्या बसने वृध्द ईसमा जोराच्या धडकेमध्ये गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी नांदेडला रुग्ण वाहिकेने नेत असताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. (School bus accident) स्कूल बस शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक वृध्द ईसम पायी चालत असताना पाठीमागून भरधाव स्कूल बसची धडकेत खाली पडल्यामुळे त्याच्या शरीराच्या अर्ध्या भागातून स्कूल बस गेल्यामुळे वयोवृद्ध इसम रामराव गोपाळराव कपाळे (65) रा. गोरलेगाव.ता. हदगाव.जि. नांदेड येथील रहिवासी होता.

साई इंग्लिश स्कूलच्या बस चा अपघात होताच लहान बालकांचा आक्रोश आरडाओरड  झाल्यामुळे अर्धा तास एकच गोंधळ उडाला होता. लोकांनी बालकाला समजावून सांगून पालकांची संपर्क करून बालकांना विद्यार्थ्यांना लोकांनी धीर देऊन शांत केले. (School bus accident) अपघात होताच मोठ्या प्रमाणात अर्धा तास गर्दीचे स्वरूप होते. घटनास्थळी पोलीस दाखल होताच रस्ता सुरळीत करूंन स्कूल बस तब्येत घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार शेख बाबर पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर भोंग हे करीत आहेत

Related to this topic: