CEO Vivek Gaikwad: हिंगोली जिल्हा परिषदेच्या आय-गॉट प्रणालीवरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांना मुंबईत सन्मानित करण्यात आले.
हिंगोली (CEO Vivek Gaikwad) : साधना सप्ताह कार्यक्रमा दरम्यान आय-गॉट प्रणालीवरील नोंदणी व प्रशिक्षण उपक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेने सक्रिय सहभाग नोंदवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड (CEO Vivek Gaikwad) यांना ८ मे शुक्रवार रोजी मुंबई येथील मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे आयोजित टेकवारी २.० कार्यक्रमात उत्कृष्ट साधना सप्ताह पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार कौशल्य विकास, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी अपर मुख्य सचिव (सेवा) श्रीमती व्ही. राधा यांची प्रमुख उपस्थिती होती.
हिंगोली जिल्हा परिषदेने आय-गॉट प्रणालीवरील नोंदणी व प्रशिक्षण मोहिमेमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केल्याने हा सन्मान प्राप्त झाला आहे. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड तसेच जिल्हा परिषद प्रशासनाचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.