Breaking News
  • तळकोकणात गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; गणपती बाप्पाचे वाजत गाजत आगमन
  • नाशिकच्या बागलाणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
  • मयूर रथातून होणार दगडूशेठ गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक
  • नागपुरात अतिक्रमणधारकांविरोधात मनपा-पोलिसांची कठोर कारवाई
  • बुलडाण्यात आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
  • मानाचा पहिला कसबा गणपती मंदिरासमोर ढोल वादन सुरू
  • गावा गावातून मराठा बांधव आक्रमक, मुंबईच्या दिशेने निघण्याची तयारी सुरू
  • रायगडमध्ये घरोघरी गणरायाच आगमन
  • बाप्पासाठी चांदीचा थाट! येवल्यात चांदीचे मोदक, फुलं अन् उंदीरमामांची क्रेझ

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

Vishwa Public School

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत रिसोडच्या 'विश्वा पब्लिक स्कूल'चा डंका!

गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रत्यय नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत आला.


राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत रिसोडच्या विश्वा पब्लिक स्कूलचा डंका

संस्थापक अध्यक्ष विश्वनाथजी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी; दोन 'सुपरस्टार' बहुमान, दोन राज्यस्तरीय प्रथम क्रमांक

रिसोड  : "आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे आणि या स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वगुणसंपन्न असणे अत्यंत महत्त्वाचे आहे," या ब्रीदवाक्याला अनुसरून रिसोड येथील विश्वा पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्येही सक्षमपणे उभे राहावेत, या उद्देशाने शाळेमार्फत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परीक्षांची माहिती देत त्यांची नियोजनबद्ध पूर्वतयारी करून घेतली जाते.

या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रत्यय नुकत्याच छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत आला. या स्पर्धेत विश्वा पब्लिक स्कूलच्या चार विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेसह रिसोड तालुक्याचे नाव राज्यभर उज्ज्वल केले.

🏆 राज्यस्तरीय यशाचे मानकरी

  • स्पर्श सुरज कानकटाव (इयत्ता ३ री) – राज्यस्तरीय 'सुपरस्टार' बहुमान.
  • अद्विक शिवाजी देशमुख (इयत्ता ३ री) – राज्यस्तरीय 'सुपरस्टार' बहुमान.
  • श्लोक शिवाजी देशमुख (इयत्ता ४ थी)चौथ्या लेव्हलमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक.
  • मृण्मयी माणिक मुटकुळे (इयत्ता ५ वी)पहिल्या लेव्हलमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक.

विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार

या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष माननीय श्री विश्वनाथजी सानप आणि मुख्याध्यापक श्री जीभित नायक यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष श्री विश्वनाथजी सानप म्हणाले,

"आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्पर्धा ही जागतिक दर्जाच्या विद्यार्थ्यांसोबत आहे, हे लक्षात घेऊन आम्ही प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या गुणांना योग्य मंच मिळावा आणि त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, हेच आमच्या संस्थेचे ध्येय आहे."

Related to this topic: