Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

ॲड. डॉ. रत्नघोष ठाकरे

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा जोर..

Adv. Dr. Ratnaghosh Thackeray:डॉ. रत्नघोष ठाकरे यांनी विदर्भासाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन पाठवले आहे. त्यात विदर्भातील समस्या आणि विकासाची गरज नमूद केली गेली आहे.


स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीला पुन्हा जोर

Adv. Dr. Ratnaghosh Thackeray |

 

राष्ट्रपती व पंतप्रधानांना ॲड. डॉ. रत्नघोष ठाकरे यांचे निवेदन

घोट (Adv. Dr. Ratnaghosh Thackeray) : नागपूर राजधानीसह स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करण्यात यावी,अशी मागणी ॲड. डॉ. रत्नघोष एन. ठाकरे यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन उपविभागीय अधिकारी,चामोर्शी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.सदर निवेदनात भारतातील मोठ्या राज्यांच्या तुलनेत लहान राज्यांमध्ये प्रशासन अधिक कार्यक्षम व लोकाभिमुख होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.१९५३ मध्ये आंध्रप्रदेश राज्याची निर्मिती तसेच १९५६ च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार विविध भाषिक राज्यांची निर्मिती करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात बिहारमधून झारखंड, उत्तरप्रदेशमधून उत्तराखंड आणि मध्यप्रदेशमधून छत्तीसगड अशी तीन नवीन राज्ये निर्माण करण्यात आली. त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात तेलंगणा राज्याची निर्मिती झाली असून ही लहान राज्ये आज विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत असल्याचे निवेदनात नमूद आहे.महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या मोठी असल्याने विदर्भातील प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्या,बेरोजगारी, उद्योगांची अंधोगती,माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणुकीचा अभाव, नक्षलवाद,कुपोषण, पर्यटन विकासाचा अभाव तसेच खनिज संपत्तीचा योग्य वापर न होणे असे अनेक गंभीर प्रश्न कायम असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

विदर्भ हा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असूनही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे सांगत महाराष्ट्राची आर्थिक परिस्थितीही कमकुवत झाल्याने विदर्भाच्या विकासाच्या गरजा पूर्ण होणे कठीण असल्याचे ॲड डॉ. ठाकरे (Adv. Dr. Ratnaghosh Thackeray) यांनी नमूद केले आहे.विकासाच्या दृष्टीने लहान राज्यांची आवश्यकता लक्षात घेता विदर्भाला देशाचे ३० वे स्वतंत्र राज्य घोषित करण्यात यावे,अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.तसेच या संदर्भातील कार्यवाहीची माहिती त्वरीत कळवावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

Related to this topic: