Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ

प्रशासनाचा ‘ऑल इज वेल’चा दावा; मात्र पातुरात गॅससा

प्रशासनाचा ‘ऑल इज वेल’चा दावा; मात्र पातुरात गॅससाठी ग्राहकांच्या रांगा!



‘मनात्मा इंडियन गॅस एजन्सी’ बंद असल्याने नागरिक हवालदिल; या गोंधळाला जबाबदार कोण?
पातूर (प्रतिनिधी):
इराण-इस्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस सिलिंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचा दावा एकीकडे सरकार व स्थानिक प्रशासन करत आहे. मात्र, प्रत्यक्षात पातूर शहरात या दाव्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. प्रशासनाकडून मुबलक गॅस उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
एजन्सी बंद, ग्राहक वाऱ्यावर
पातूर शहरातील ‘मनात्मा इंडियन गॅस एजन्सी’ हे केंद्र काल बंद असल्याचे दिसून आले. लांबून पायपीट करत आलेल्या ग्राहकांना रिकामे सिलिंडर घेऊन ताटकळत उभे राहावे लागले. एजन्सी का बंद आहे? आणि बुकिंग होऊनही गॅस का मिळत नाही? याचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी तेथे कोणीही जबाबदार व्यक्ती उपलब्ध नसल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून आणि दुकानदारांकडून ‘गॅस उपलब्ध आहे’ असे सांगितले जात असताना या रांगा का लागत आहेत, याचे कोडे ग्राहकांना सुटेनासे झाले आहे.
प्रशासन आणि एजन्सीची हातमिळवणी?
एकीकडे जिल्हा पुरवठा विभाग विशेष भरारी पथके तैनात करून साठा तपासणीचे दावे करत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्ष जमिनीवर ग्राहकांना गॅससाठी वणवण करावी लागत आहे. ऑनलाइन बुकिंगमध्ये मुद्दाम तांत्रिक अडचणी दाखवल्या जात असून, ग्राहकांना प्रत्यक्ष एजन्सीवर चकरा मारण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप होत आहे. प्रशासनाने दिलेली हेल्पलाइन देखील ‘हेल्पलेस’ ठरत असल्याचे चित्र आहे.
नियम केवळ कागदावरच?


शहरी भागात २५ दिवस आणि ग्रामीण भागात ४५ दिवसांनंतरच गॅस मिळेल, असे संदेश ग्राहकांना मिळत आहेत. मात्र, ३० दिवस पूर्ण होऊनही बुकिंग होत नसल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. “जर पुरवठा मुबलक आहे, तर आम्हाला रांगेत का उभे राहावे लागते?” असा रोखठोक सवाल आता पातूर तालुक्यातील गृहिणी उपस्थित करत आहेत.
तातडीच्या कारवाईची मागणी
गॅस हा जीवनावश्यक घटक असल्याने, मुद्दाम टंचाई निर्माण करणाऱ्या किंवा विनाकारण एजन्सी बंद ठेवणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. 


प्रतिक्रिया/
राहुल वानखडे तहसीलदार पातुर:_
पातुर तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारची गॅस टंचाई नसून कोणी साठेबाजी करत असेल तर तात्काळ प्रशासनाकडे तक्रार करावी नियमाप्रमाणे सर्वांना गॅस वितरित करण्यात येणार आहेत

Related to this topic: