Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

सुधाकर देशमुख

विदर्भ-मराठवाड्याच्या पिकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करा; सुधाकर देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sudhakar Deshmukh: विदर्भ आणि मराठवाड्यातील कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याची मागणी सुधाकर देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


विदर्भ-मराठवाड्याच्या पिकांसाठी स्वतंत्र समिती स्थापन करा सुधाकर देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Sudhakar Deshmukh |

​रिसोड (Sudhakar Deshmukh) : कांदा उत्पादक शेतकरी, ग्राहक आणि शासन यांच्यातील क्लिष्ट प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ज्या धर्तीवर विशेष समिती स्थापन केली आहे, अगदी त्याच धर्तीवर विदर्भ आणि मराठवाड्याची मुख्य पिके असलेल्या कापूस, सोयाबीन आणि तूर यांसाठीही स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी आग्रही मागणी महाविकास आघाडीचे जिल्हा समन्वयक तथा नगरसेवक सुधाकर देशमुख (Sudhakar Deshmukh) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

कांदा प्रश्नावर पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच, देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या आहेत. ते म्हणाले की, कापूस, सोयाबीन आणि तूर उत्पादक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून बाजारभावातील प्रचंड चढ-उताराचा फटका सहन करत आहेत. सध्या या पिकांचे बाजारभाव हमीभावापेक्षाही (MSP) खाली गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

धोरणांमधील अस्थिरतेचा फटका
केंद्राच्या अस्थिर आयात-निर्यात धोरणामुळे बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण होत असून, नेमक्या हंगामाच्या तोंडावर निर्यातीवर निर्बंध लादणे किंवा आयातीचे निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांचा फायदा आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. आयात-निर्यात धोरणात सातत्य आणि स्थैर्य असणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले. खते, बियाणे आणि मजुरीचा खर्च गेल्या काही वर्षांत दुपटीने वाढला आहे. मात्र, कापूस, सोयाबीन आणि तुरीला मिळणारे दर अजूनही दहा वर्षांपूर्वीच्याच पातळीवर आहेत. उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा ताळमेळ बसवण्यासाठी कृषी तज्ज्ञांची एक स्वतंत्र समिती नेमून या पिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी (Sudhakar Deshmukh) सुधाकर देशमुख यांनी केली आहे.

Related to this topic: