अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत,
यवतमाळ (Vehicle Theft) : अवधूतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीच्या तीन गाड्या जप्त केल्या आहेत, मयंक सुभाष पाईकराव रा. मुलकी यवतमाळ हा संशयित इसम प्रयासवन परिसरात एक चोरीचे वाहन घेऊन विक्रीच्या उद्देशाने फिरत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून मयंकला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याची सखोल चौकशी केली असता, त्याने आपल्या सहकार्यांच्या मदतीने शहरातील विविध भागांतून वाहने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून आर्णी रोड परिसरातील एका चोरीच्या ओम्नी कारचा शोध लागला, तसेच चौकशीदरम्यान त्याने अन्य दोन दुचाकी चोरल्याचेही मान्य केले. पोलिसांनी आरोपीकडून एकूण १ लाख १० हजार रुपये किमतीची तीन वाहने हस्तगत केली. अपर पोलीस अधीक्षक आणि विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली, पो.नि. नंदकिशोर काळे यांच्या नेतृत्वात पार पडली. या पथकात सहा.पो.नि. श्रीकांत जिंदमवार, पो.उ.नि. सूरज जगताप, एएसआय सुरेश मेश्राम, व इतरांचा समावेश होता.