Wasmat Crime: वसमत येथील बगाडी परिसरात फोन न उचलण्याच्या कारणावरून तीन जणांनी एका व्यक्तीला मारहाण केली आणि धमकी दिली. पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला.
वसमत (Wasmat Crime) : येथील बगाडी परिसरात फोन का उचलत नाही म्हणून शिवीगाळ करून मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यामध्ये तीन जनाविरोधात (Wasmat Crime) गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसमत येथील हाजीदिवाण मोहल्ला येथील रहिवाशी शेख अहमद शेक इकबाल, त्याने वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यास हाजीदिवाण मोहल्ला परिसरातील तीन जणांनी मारहाण करून जखमी केले आहे. डोक्यात काचेची बाटली मारून डोके फोडले असून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या (Wasmat Crime) तक्रारीवरून वसमत शहर पोलीस ठाण्या शेखनाजर शेखपाशा, शेख फाजल शेखसाबेर, शेखसलीम शेख हरुन, सर्व राहणार वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणात पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मात्रे करत आहेत.