Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वसमत लाचलुचपत प्रकरण

वसमत येथील पुर्णा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीकास लाच लुचपत प्रकरणात जामीनवर मुक्तता

Wasmat bribery case: वसमतमध्ये वरिष्ठ लिपीक शेख सलीम अब्दुल अहेमद यांची लाचलुचपत प्रकरणात जामीनावर मुक्तता केली गेली आहे. त्यांना 1 हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले होते.


वसमत येथील पुर्णा पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीकास लाच लुचपत प्रकरणात जामीनवर मुक्तता

Wasmat bribery case |

वसमत (Wasmat bribery case) : 27 मार्च रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश वसमत डि.बी. बंगाडे यांनी पुर्णापाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपीक शेख सलीम अब्दुल अहेमद यांची आज रोजी लाच लुचपत प्रकरणात जामवर मुक्तता केली आहे.

या बाबतची थोडक्यात हकीकत अशी की, सिंचन व्यवस्थापन उपविभाग क्र. 3 मधिल वरिष्ठ लिपीक यांनी कर्मचारी यांच्या वेतनाचे देयक तयार करुन त्यावर उपकार्यकारी अभियांता आस्थापना यांची स्वाक्षरी घेवुन कोषागार विभागात जमा केल्याने त्याबद्दल 1 हजार रुपयांची मागणी केली त्यावरुन त्यांनी लाचलुचपत प्रतीबंध विभाग हिंगोली यांच्याकडे तक्रारदार यांने तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचुन 1 हजार रुपये लाच (Wasmat bribery case) घेतांना रंगेहात पकडण्यात आले होते अशा आशयाची फिर्याद पो.स्टे. वसमत शहर येथे गुन्हा नोंदविण्यात आला व आरोपी यांना अटक करण्यात आली होती.

सदरील प्रकरणात आरोपीच्या वतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश वसमत येथे ॲड.जे. एस.पठाण मार्फत जामिन दाखल करण्यात आला सदरील प्रकरणात आरोपीचे वकील ॲड.जे.एस.पठाण यांनी युक्तीवाद केला. मा.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश वसमत यांनी सदरील गुन्हयात आरोपीचे विधिज्ञ ॲड.जे.एस.पठाण यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपीची जमानत अटी व शर्तीवर मंजुर केली. आरोपीचे वतिने वकील ॲड.जे.एस.पठाण यांनी काम पाहिले व त्यांना ॲड सोहेल सिध्दीकी, ॲड जे. जे. सय्यद, ॲड आसिम शेख, ॲड आसिफ शेख, ॲड  काजल वर्मा, ॲड राधेश्याम कऱ्हाळे यांनी सहकार्य केले.

Related to this topic: