Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

चिमुकली अत्याचार प्रकरण

वसमत येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आक्रमक महामोर्चा

Child Abuse Case: वसमत येथे ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या महामोर्चात चिमुकलीवरील अत्याचाराबद्दल न्यायाची मागणी करण्यात आली. फाशीच्या शिक्षेची मागणी केली गेली.


वसमत येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा आक्रमक महामोर्चा

Child Abuse Case |

 

चिमुकलीवर अत्याचार करणार्‍याला फाशीच्या शिक्षेची मागणी

वसमत (Child Abuse Case) : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे एका चिमुकलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ शाखा वसमतच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला. या प्रकरणातील नराधमास मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी बुधवार, ६ मे रोजी उपविभागीय अधिकारी, वसमत यांना निवेदन सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, नरसापूर जि. पुणे येथील अल्पवयीन मुलीवर अघोरीपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. ही (Child Abuse Case) घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून अशा विकृत प्रवृत्तीच्या नराधमास समाजात राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे या आरोपीस व भविष्यात अशा प्रकारचे अघोरी कृत्य करणार्‍यास मरेपर्यंत फाशीचीच शिक्षा व्हावी, जेणेकरून पुन्हा अशी घटना घडणार नाही, अशी मागणी महासंघाने केली आहे.महासंघाने प्रशासनाकडे या प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्याची मागणीही केली आहे.

यावेळी महासंघाचे पदाधिकारी आनंद बाबुराव औसेकर, अनिल सुधाकरराव देशपांडे, रवि बडवणे, सुनील दत्तोपंत काळे, अविनाश श्रीनिवास गिरगांवकर, प्रकाश माणिकराव कहान यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. सर्व पदाधिकार्‍यांच्या सह्याचे हे निवेदन उपविभागीय कार्यालयात सादर करण्यात आले आहे. या घटनेमुळे वसमत तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत असून, पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी समाज एकवटला आहे. आनंद बाबुराव औसेकर, अनिल सुधाकर देशपांडे ,आनंद बडवने,सुनील दत्तोपंत काळे ,अविनाश श्रीनिवास गिरगांवकर , प्रकाश माणिकराव कहात , अ‍ॅड. सोमेश पोतदार, अ‍ॅड. सुयश कातनेश्वरकर, जीवन प्रभाकरराव माळवटकर , मुकुंद रामेश्वरराव  मोहरीर , श्याम शिवाजीराव कुलकर्णी ,सुहान सुभाषराव कुलकर्णी , दिलीप गंगाधरराव माळवटकर , सुधीर तुटनीकर, राजेंद्र रामचंद्र देशपांडे , गजेंद्र दिगंबरराव मोहळकर,अ‍ॅड.व्ही.व्ही. खोत , सौ. आरती धनंजय मडके ,सौ. वर्षा रवींद्र मोहरीर , सौ. सुनिता नंदकिशोर पारवेकर , लक्ष्मी माणिकराव कुलकर्णी , धनंजय विशारद मडके , अमेय अरविंद मडके ,सौ. अनिता सुनिल पांडे, सौ.सुनिता पारवेकर, सौ. अनुराधा नाथ पल्हणे , शाम हनुमतंराव लांडगे, राजु दुर्गादास पत्की , दत्तात्रय भुजंगराव पांडे , नंदकिशोर भास्करराव रावळे, दिलीप नारायणराव मोहळकर ,वसंत अंबादासराव लोहरेकर, भास्कर नरसिंगराव कुलकर्णी ,रवी रामराव मोहरीर , राम नागनाथराव माळवटकर , विजय वसंतराव कसबेकर ,साहिरा वसंतराव अंबेकर ,दिनेश गणपतराव पांडे ,अक्षय कोठाळे , बलदेव विलासराव देशपांडे, सौ. नलिनी लोखंडे ,अ‍ॅड. सुभाष कॉलोकार, उमेश बी. बोधापुरे , पंकज कुंडलिकराव घोडे ,महेश दत्तात्रय बलुर, सौ. सुमेधा सुधीर कुलकर्णी , सौ. चंदा शाम माळवटकर, सौ. अंजली शंकर कुलकर्णी , सौ. सारिका देवळकर , सौ. वर्षा संजय इनामदार , सौ. मीना आंबादास माळवटकर , सौ. प्रतिभा मारेश्वर पांडे , मोरेवडकर ज्ञानेश्वर जाधव, अमित अशोकराव देशपांडे ,सौ.सुनिता देशपांडे, अरुण कोठीखाने, सौ. सीमा विलास बडवने , विनोद लाठकर, सौ. कुमुदिनी रमेश बडवने , श्याम गोविंदराव देशपांडे , रेणुकादास रामराव पांचाळ , नारायण शिवीब वाचले , नागनाथ सखाराम नेरलकर , संजय सुदीप  नाइक, सौ. निलिमा शाम बिडकर , सौ. सरोज प्रकाशराव कहात ,सौ. जयश्री अनिलराव देशपांडे , सौ. चंद्रा रवींद्र दीक्षित , रविंद्र रामराव दीक्षित आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Related to this topic: