Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

माती वाहतूक अपघात

वीटभट्टीसाठी माती वाहतूक करणाऱ्या हायवाने पुन्हा घेतला एक बळी

Soil Transport Accidents: वसमतमध्ये माती वाहतूक करणाऱ्या हायवामुळे पुन्हा एक बळी गेला. गतवर्षीच्या दुर्घटनेनंतर सुरक्षिततेच्या उपाययोजना कार्यान्वित न झाल्याने समस्या कायम आहे.


वीटभट्टीसाठी माती वाहतूक करणाऱ्या हायवाने पुन्हा घेतला एक बळी

Soil Transport Accidents |

गतवर्षी वसमत येथे हायवाने घेतले होते दोन बळी तहसील कार्यालया समोरून धावतात मातीचे हायवा

वसमत (Soil Transport Accidents) : गतवर्षी वसमत येथे माती वाहतूक करणाऱ्या हायवाने दोन बळी घेतल्याच्या घटनेचे दुःख कमी होण्याच्या आतच पुन्हा एकदा मातीच्या हायवाने बळी घेतला आहे परभणी वसमतरोडवर रविवारी झिरो फाट्याजवळ झालेल्या अपघातातील हायवा वसमत येथीलच वीटभट्ट्यांसाठी माती वाहतूक करणारा असल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे माती वाहतूक करणारे हायवा वसमत तहसील कार्यालया समोरूनच रात्रंदिवस धावतात  महसूल व आरटीओ विभागाच्या दुर्लक्षामुळे वीटभट्टीसाठी माती वाहतूक करणारे हायवा  जीवावर उठत आहेत त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

परभणी वसमत रस्त्यावर झिरो फाट्याजवळ 29 मार्च रोजी हायवाने (Soil Transport Accidents) कारला धडक दिल्याने एक जण ठार झाला होता या अपघातातील हायवा परभणीहून वसमत येथे वीटभट्टीसाठी माती घेऊन येत असल्याचे स्पष्ट झाले आहे परभणी जिल्ह्यातून  वीटभट्ट्यांसाठी  लागणारी माती घेऊन येणारे हायवा प्रचंड संख्येनेआहेत फक्त माती वाहतूक करण्यासाठी 50 ते 60 हायवा आहेत प्रत्येक हायवा दिवसभरातून चार ते पाच ट्रिप करतो 200 ते 250  हायवा भरून माती वसमतच्या वीट भट्ट्यांवर दररोज येऊन पडत आहे यातील कित्येक हायवाकडे माती वाहतुकीचा परवाना नाही, चालकाकडे गाडी चालवण्याचा परवाना नाही, तीन चार ब्रास माती वाहतुकीची क्षमता असलेल्या हायवाच्या बॉडी मध्ये फेरबदल  गैर कायदेशीर पद्धतीने हायवाबॉडीची उंची वाढवण्यात आली आहे. त्यामुळे दहा ब्रास पर्यंत माती भरून वाहन सुसाट वेगाने शहरात दाखल होत असतात.

  भल्या पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत तुफान वेगाने हायवा शहरात ये जा करतात वसमत तहसील कार्यालय वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्यासमोरूनच एवढ्या प्रचंड प्रमाणात विनापरवाना अवैध पद्धतीने मातीची वाहतूक होत असते या माती वाहतूक करणाऱ्या वाहनांचा परवाना तपासण्याची तसदी सुद्धा कधी तहसील कार्यालय उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी घेत  नाहीत मातीच्या हायवाकडे रॉयल्टीची पावती  तपासण्याची मोहीम सुद्धा राबवली जात नाही यावरून कारभार कसा चालू आहे हे स्पष्ट दिसते.

 " वसुली" पथक सर्व वाहनांचा हिशोब व्यवस्थित ठेवत असल्याने अवैध माती वाहतूक करणाऱ्यांना "सहारा"मिळत आहे वसुली पद्धतीने अनेकांचे घर भरत असले तरी प्रचंड वेगाने धावणाऱ्या या हायवा मुळे अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत. गतवर्षी 3 एप्रिल रोजी वसमत शहरात कवठा रोडवर भरधाव वेगाने चालणाऱ्या हायवाने ऑटोला चीरडून दोन जणांचा बळी गेला होता त्या अपघातानंतर काही दिवस माती वाहतुकीला लगाम लागला होता मात्र पुन्हा नव्या जोमाने मोठ्या आकाराचे हायवा दाखल झाले असून. त्यातून महसुलाच्या तिजोरीला चुना लावल्या जात आहे  किती बळी गेल्यानंतर महसूल विभाग माती वाहतूक करणाऱ्या हायवा कडे लक्ष देणार आहे असा प्रश्न विचारला जातो.

वाहनांच्या रचनेतही फेरफार

दोन ब्रास च्या एकाच पावतीवर दिवसभरातून अनेक ट्रिप मारणे सुरू असते "वसुली वाल्यांचा सहारा" असल्याने कारवाईची भीती नसते हायवाच्या बॉडी मध्येही बेकायदेशीर पद्धतीने बदल केलेले आहेत आरटीओ पथकाचेही दुर्लक्ष आहे विनाक्रमांकाचे ओव्हरलोड व लायसन्स नसलेले अनेक ड्रायव्हर दिवसभरात 200 पेक्षा जास्त ट्रीप करत असताना फक्त एक हायवा तहसील कार्यालयात लावला असल्याचे चित्र आहे. तुफान वेगाने धावणाऱ्या मातीच्या हायवा मुळे एकापाठोपाठ एक अपघात घडत असून बळी जात आहेत या प्रकाराला रोखावे अशी मागणी होत आहे.

आरटीओ सुद्धा बळीला कारणीभूत

मातीच्या हायवा मुळे एकापाठोपाठ एक अपघात होऊन बळी जात आहेत. या बळीला आरटीओ विभाग सुद्धा जबाबदार ठरत आहे शेकडोच्या संख्येने हायवा एकट्या वसमत मध्ये राष्ट्रीय महामार्गाने दिवसभर ओव्हरलोड माती वाहतूक करत असताना आरटीओ कधीच कारवाई करत नाही. यावरून आरटीओपर्यंत "भरण" जात असल्याच्या चर्चेला पुष्टी मिळते त्यामुळे मातीच्या हायवा मुळे जात असलेल्या बळीला आरटीओ  जबाबदार असल्याचे आरोप होत आहेत.

Related to this topic: