Ashutosh Chinchalkar: वसमत नगरपालिकेत आशुतोष चिंचाळकर यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ति झाली. त्याने शहरातील विकास योजनांवर काम करण्याचा निर्णय घेतला, वसुनीचा पाणी पुरवठा
धडाकेबाज अधिकारी आल्याने अनेक विकासाचे प्रकल्प लागणार मार्गी
वसमत (Ashutosh Chinchalkar) : नगर पालिकेच्या मुख्याधिकारीपदी विकास कामांना चालना देणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांची नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. पूर्णवेळ व कर्तव्यदक्ष धडाकेबाज मुख्याधिकारी वसमत शहराला लाभल्याने वसमतनगरपालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विकासाच्या प्रकल्पाला गती येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकात आनंदाचे वातावरण आहे.
नगर विकास विभागाने मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश व नियुक्तीचे आदेश काढले आहेत. यामध्ये वसमत नगरपालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी शेख रफिक कंकर यांची वसमत येथून बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मुख्याधिकारी म्हणून बीड जिल्ह्यातील किल्लेधारूर येथील मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर (Ashutosh Chinchalkar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 18 जून रोजी ते वसमत नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा पदभार स्वीकारणार असल्याचे वृत्त आहे.
वसमत नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून काम करण्याचा अनुभव असलेले मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर (Ashutosh Chinchalkar) हे कर्तव्यदक्ष व धडाकेबाज अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. शहराच्या विकासाच्या विविध योजना व प्रकल्प त्यांनी त्यांच्या काळात राबवले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळणार आहे. कणखर मुख्याधिकारी लाभल्याने पाणी, स्वच्छता, लाईट यासारख्या मूलभूत सुविधा याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष राहील यात शंका नाही.
वसमत शहरात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याच्या योजनेत त्यांचा मोठा हातभार आहे पाणीपुरवठा योजना शहरातील विविध भागातील रस्ते व नियोजित प्रकल्प यांना आगामी काळात गती मिळणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे सर्व सामान्य नागरिक कर्मचारी वर्गातून स्वागत होत आहे.