Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

वरुर इसम मृत्यू

दिना नदीत मासेमारीदरम्यान इसमाचा बुडून मृत्यू

Varur Youth death: वरुर येथे वसंत हरी चापले यांचा मासेमारीदरम्यान दिना नदीत बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे गावात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.


दिना नदीत मासेमारीदरम्यान इसमाचा बुडून मृत्यू

Varur Youth death |

 

वरुर येथील घटना; गावात हळहळ व्यक्त

घोट (Varur Youth death) : चामोर्शी तालुक्यातील वरुर येथील वसंत हरी चापले (वय ६० वर्ष) यांचा नजीकच्या दिना नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. ०७ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास वसंत चापले हे गावातील काही इसमांसोबत वरुर येथून सुमारे ३ किलोमीटर अंतरावरील दिना नदीवर मासेमारीसाठी गेले होते. मासेमारीदरम्यान ते नदीतील खोल डोहात गेल्यानंतर बाहेर आले नाहीत.

सोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते आढळून आले नाहीत. दरम्यान, सायंकाळी हवामानात अचानक बदल होऊन वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने शोधकार्य थांबवावे लागले. आज दि. ०८ मे रोजी सकाळी गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी वसंत चापले यांचा मृतदेह नदीतील डोहात आढळून आला. गावातील मारोती चौधरी यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढून नदीकाठी आणला.

या (Varur Youth death) घटनेची माहिती घोट पोलीस मदत केंद्रात देण्यात आली असून घोट पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वरुर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related to this topic: