Varora ginning fire: वरोरा तालुक्यातील रविकमल जिनिंगमध्ये आग लागून सुमारे दोन कोटी रुपयांचा कापूस जळून खाक झाला. आगीचे कारण जेसीबी बकेट व फ्लोरिंगमधील घर्षण असावे.
जेसीबी बकेट व फ्लोरिंग घर्षणामुळे आग
वरोरा (Varora ginning fire) : तालूक्यातील सर्वात मोठी कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात असलेल्या वरोरा येथील रविकमल जिनिंग मधील खरेदी केलेल्या कापसाला आज दुपारी ४ वाजता च्या सुमारास आग लागली. अचानक लागलेल्या सदर आगीत सुमारे २० हजार क्विंटल अंदाजे किमंत २कोटी रुपयाचा कापूस जळाल्याचा अंदाज जिनिंग मालक राजेंद्र छोटुमाल चोरडिया व संदेश चोरडिया यांनी सांगितले.
रविकमल जिनिंग मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कापूस ठेवण्यात आला होता. दोन दिवसात जिंनिंग होणार होते पण साठविलेल्या कापसाला अचानक आगीचा भडका उडाल्याचा जिनिंगमधील कामगारांना दृश्य दिसले. त्यांनी लगेच ही माहिती मालकांना दिली असता लगेच काही वेळानंतर जिंनींग मधील उपलब्ध असलेल्या पाणी व्यवस्थेमुळे आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला गेला, नंतर काही वेळाने नगर परिषद व जिएमआर कंपनीची ची फायर बिग्रेड च्या गाड्या आल्या त्यांनी सुद्धा प्रयत्न केला गेला पण आग मात्र विझत नव्हती शेवटी हिंगणघाट वणी व चंद्रपूर येथून सुमारे ८ अग्निशमक गाड्या बोलाविण्यात आल्या होत्या काही वेळाने आग आटोक्यात आणली गेली.
आग कापुस उचलणाऱ्या जेसीबी यंत्राच्या लोखंडी बकेट व सिमेंट फ्लोरिंग मध्ये झालेल्या घर्षना मुळे आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात असून आगीलगत असलेल्या कापूस गाठी त्वरित गेल्या असल्याने गाठी बचावल्या गेल्याने सुदैवाने नुकसान टाळता आले. शेतकऱ्यांची व भागातील अनेक नागरिकांची आग बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती.पोलिसांनी पारीस्थिती आटोक्यात आणली.सर्वच व्यापारी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक. यांनी घटना स्थळी भेटी दिल्या.