Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

मानोरा वन प्रशासन

कागदोपत्री मिश्र रोपवनाच्या चौकशीच्या भीतीने वन प्रशासनाकडून रोपे लावण्याचा खटाटोप!

Manora Forest Office: प्रशासनाने हे लक्षावधी रुपये कागदावर खर्च करून लावलेली एकही रोपे जगवली नसल्याचा कागदी रोपवन घोटाळा उघडकीस आल्याने संभाव्य कारवाईच्या भीतीने वन विभागाने आता घाईघाईने रोप लागवड


कागदोपत्री मिश्र रोपवनाच्या चौकशीच्या भीतीने वन प्रशासनाकडून रोपे लावण्याचा खटाटोप

Manora Forest Office |

मानोरा (Manora Forest Office) : गिरोली वन वर्तुळातील सावरगांव कान्होबा वन बीट मधील कक्ष क्र. १३८ मधील ३० हेक्टर मिश्र रोपवनात २०२१-०२२ मध्ये शासनाने लाखो रुपये खर्च मंजूर केलेल्या मात्र प्रशासनाने हे लक्षावधी रुपये कागदावर खर्च करून लावलेली एकही रोपे जगवली नसल्याचा कागदी रोपवन घोटाळा उघडकीस आल्याने संभाव्य कारवाईच्या भीतीने वन विभागाने (Manora Forest Office) आता घाईघाईने पुन्हा रोप लागवड सुरू केली आहे, असा खळबळजनक आरोप खापरदरी येथील सामाजिक कार्यकर्ते जगदीश शामराव राठोड यांनी केला आहे. याबाबत राठोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, मानोरा यांचेसह वरिष्ठांना लेखी निवेदन दिले आहे. 

दि.२६ जून ०२६ रोजी पंचक्रोशीचे आराध्य दैवत श्री कानिफनाथ महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी ते गेले असता, मंदिराच्या पाठीमागे असलेल्या कक्ष क्र.१३८ मध्ये काही मजूर रोपे घेऊन जाताना दिसले. विचारणा केली असता, "सरकारी उजाड रोपवनात रोपे लावण्यासाठी जातोय" असे मजुरांनी विचारले असता सांगितले.  सदर कक्षात २०२१-२२ मध्ये 'भरीव वनीकरण' योजनेअंतर्गत ३० हेक्टरवर मिश्र रोपवन करण्यात आले होते. यासाठी प्र.मा.क्र. ७० व ६० दि.२३.०९.०२२  नुसार मोठा निधी खर्च झाडे जगवण्यावर वन प्रशासनाकडून करण्यात आला. 

मात्र ४ वर्षांनंतर प्रत्यक्ष जागेवर एकही झाड जिवंत नसल्याचे आघाडीच्या सर्व वृत्तपत्रांनी पुराव्यासह उघडकीस आणले होते.  जुने रोपवन कागदावरच होते, निधी लाटला गेला. बिंग फुटल्याने आता चौकशी लागेल या भीतीने वन प्रशासनाने घाईघाईने पुन्हा रोपे लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे," असा थेट आरोप तक्रारकर्त्याने  केला आहे. "ही रोपे जगवण्यासाठी लावली जात आहेत की, भविष्यातील चौकशीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ?" असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

सध्या कक्ष क्र. १३८ मध्ये कोणत्या योजनेअंतर्गत रोप लागवड सुरू आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) नागपूर आणि उपवनसंरक्षक वाशिम यांनाही पाठवल्या आहेत. (Manora Forest Office) वृक्ष लागवड व जगवनुकीवरील मंजूर निधी ढापल्यावर ४ वर्षे दुर्लक्षित ठेवलेले सावरगांव कान्होबाचे रोपवन संभाव्य चौकशीची चाहूल लागताच अचानक हिरवे कसे होणार ? जुन्या ३० हेक्टर रोपवनाचा लाखो रुपयांचा निधी गेला कुठे, याचा हिशोब आधी द्या, अशी मागणी आता जोर धरू लागली असून नोकरी वाचविण्यासाठी वन प्रशासनाकडून जुन्या ठिकाणी नवीन रोपे लावण्याची ही सगळी धडपड केली जात असल्याच्या चर्चा यानिमित्ताने पंचक्रोशीत रंगत आहे.