Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

वारंगा फाटा येथे खळबळ; ३८ वर्षीय ऑटोचालकाचा संशयास्पद मृत्यू

कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव–झुनझुनवाडी शिवारात बुधवारी सकाळी एका ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह लिंबाच्या झाडाखाली आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.


वारंगा फाटा येथे खळबळ ३८ वर्षीय ऑटोचालकाचा संशयास्पद मृत्यू

Unnatural Death Case |

वारंगा फाटा (Unnatural Death Case) : कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव–झुनझुनवाडी शिवारात बुधवारी सकाळी एका ३८ वर्षीय युवकाचा मृतदेह लिंबाच्या झाडाखाली आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

२३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शेतात कामासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. झाडाखाली एक व्यक्ती निष्प्राण अवस्थेत पडलेली दिसताच त्यांनी तात्काळ वारंगा फाटा पोलीस दूरक्षेत्राला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

मृताची ओळख साहेबराव गौतम घनघाव (वय ३८, रा. भाटेगाव) अशी पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार त्यांचा मृत्यू २३ एप्रिल रोजीच झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

साहेबराव घनघाव हे परिसरात ऑटोचालक म्हणून काम करत होते. मनमिळाऊ स्वभावामुळे वारंगा फाटा, कळमनुरी आणि आसपासच्या गावांमध्ये ते परिचित होते. त्यांच्या अचानक निधनामुळे भाटेगाव व झुनझुनवाडी परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष गमावल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संतोष नागरगोजे आणि विठ्ठल जाधव करत आहेत. दरम्यान, मृतदेहाचे डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related to this topic: