Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

बांधकाम विरोध उपोषण

लिखित आश्वासनानंतर उपोषण मागे; मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषणाची सांगता

Risod Hunger strike: कालुशा बाबा दर्गा जवळ सुरू असलेल्या कथित अनाधिकृत बांधकामाविरोधात सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर मंगळवार, 28 जुलै रोजी मागे


लिखित आश्वासनानंतर उपोषण मागे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषणाची सांगता

Risod Hunger strike |

रिसोड (Risod Hunger strike) : कालुशा बाबा दर्गा जवळ सुरू असलेल्या कथित अनाधिकृत बांधकामाविरोधात सुरू करण्यात आलेले आमरण उपोषण प्रशासनाकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर मंगळवार, 28 जुलै रोजी मागे घेण्यात आले. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश शेवदा आणि नगराध्यक्ष भगवानदादा क्षिरसागर यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषणाची सांगता केली.कालुशा बाबा दर्गाजवळ सुरू असलेले कथित अनाधिकृत बांधकाम तातडीने थांबवून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, या मागणीसाठी मोहसीन खान, शेख तबजरोद्दीन, शेख सलीम आणि शेख कामील यांनी 27 जुलै रोजी आमरण उपोषण सुरू केले होते.

या (Risod Hunger strike) आंदोलनामुळे परिसरात नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते.उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासन आणि उपोषणकर्त्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी संबंधित प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे लिखित आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.मुख्याधिकारी सतीश शेवदा आणि नगराध्यक्ष भगवानदादा क्षिरसागर यांनी उपोषणकर्त्यांना ज्यूस पाजून उपोषण सोडविले. यावेळी नगरसेवक सतीश इरतकर, अरुण क्षिरसागर, शेख अजीज यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रकरणातील प्रशासनाच्या लिखित आश्वासनामुळे आंदोलनाची तात्पुरती सांगता झाली असून, आता संबंधित अनाधिकृत बांधकामाबाबत प्रत्यक्षात कोणती कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: