Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली

सुरेश शहा

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला यश; सुरेश शहा यांचा सत्कार

Suresh Shah: पश्चिम बंगाल येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने पानिहाटी आणि गायघाटा या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी


पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपला यश सुरेश शहा यांचा सत्कार

Suresh Shah |

घोट (Suresh Shah) : पश्चिम बंगाल येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाच्या वतीने पानिहाटी आणि गायघाटा या विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी भाजप बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा (Suresh Shah) यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. या दोन्ही मतदारसंघांत भाजपने बहुमताने विजय मिळवल्यानंतर जिल्हा कार्यकारिणी बैठकीत त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला जिल्हाप्रभारी तथा आमदार बंटी भाऊ भांगडिया, जिल्हाध्यक्ष रमेश भाऊ बारसागडे, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंदजी नरोठे, माजी खासदार अशोक भाऊ नेते, माजी आमदार डॉ. नामदेवजी उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष किसन भाऊ नागदेवे, प्रशांत भाऊ वाघरे, बाबुराव कोहळे, ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चा सचिव रमेश भाऊ भुरसे, नगराध्यक्ष प्रनोती ताई निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष योगिता ताई पिपरे तसेच जिल्हामहामंत्री सदानंद भाऊ कूथे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुरेश शहा यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सुरेश शहा (Suresh Shah) यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.