दुचाकी व दूध डेरी टेम्पोच्या भीषण अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी 

दूध डेरी टेम्पो व विना नंबरच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोघेजण झाल्याची घटना  1 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान घडली आहे. 

दुचाकी व दूध डेरी टेम्पोच्या भीषण अपघातात एक ठार दोन गंभीर जखमी 

Traffic Collision​​​​​​​

औंढा नागनाथ (Traffic Collision) : औंढा नागनाथ ते वसमत जाणाऱ्या मार्गावर औंढा नागनाथ शहराजवळील खंडेश्वरी मंदिरा जवळ भरधाव दूध डेरी टेम्पो व विना नंबरच्या दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोघेजण झाल्याची घटना 1 एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान घडली आहे. 

या भीषण अपघातात शिवम हरिभाऊ चौरे वय पंचवीस वर्षे राहणार पिंपळा तालुका वसमत यांचा मृत्यू झाला तर प्रदीप दत्तराव सवंडकर वय 20 वर्ष राहणार टेंभुर्णी तालुका वसमत, अमजदखा शरीफखा पठाण वय 19 वर्षे राहणार कातनेश्वर हे गंभीर जखमी झाले.भरधाव दूध डेरी टेम्पो क्रमांक एम एच 38 एक्स 4491 हा औंढा नागनाथ कडे येत होता तर विना क्रमांकाच्या दुचाकी वर युवक औंढा नागनाथ कडून वसमत कडे जात असताना खांडेश्वरी देवी मंदिराजवळ हा भीषण अपघात घडला. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस पोलीस अंमलदार ओंकारेश्वर रांजणेकर हे एमसीआर झालेल्या आरोपींना परभणी कारागृहात सोडून वापस येत असताना अपघात घडल्याचे दिसताच त्यांनी तात्काळ माहिती औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे यांना दिली व तत्काळ 108 वरून रुग्णवाहिकेस फोन लावला तर यानंतर पोलीस निरीक्षक जी.एस राहिरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार वसीम पठाण, अमलदार ओंकारेश्वर रांजणेकर, माधव सूर्यवंशी, बबन चव्हाण, संतोष धनवे, माधव लोंढे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे औंढा नागनाथ रुग्णालयात दाखल केले दरम्यान या अपघातात शिवम हरिभाऊ चौरे वय 25 वर्षे राहणार पिंपळा यांचा मृत्यू झाला अपघात प्रकरणी औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदीची प्रक्रिया सुरू होती.

संबंधित सामग्री

भरधाव कार उतरली रस्त्याखाली पाच जण गंभीर जखमी 

भरधाव कार उतरली रस्त्याखाली पाच जण गंभीर जखमी 

Aundha Nagnath Car Accident: औंढा नागनाथ ते जिंतूर जाणाऱ्या मार्गावर माथा गावाजवळ असलेल्या कृषी महाविद्यालय जवळ औंढा नागनाथ कडून जिंतूर कडे जाणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर कार वरील चालकाचे नियंत्रण..

Nov 01, 2026
औंढा ना. पोलिस ठाणे हद्दितील तिघांवर हद्दपारीची कारवाई

औंढा ना. पोलिस ठाणे हद्दितील तिघांवर हद्दपारीची कारवाई

Aundha Nagnath Police Action: पोलीस ठाणे हद्दीतील गावात सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून सार्वजनिक शांततेचा भंग करणार्‍या औंढा नागनाथ तालुक्यातील उमरा येथील दोघेजण..

Nov 01, 2026
सिद्धेश्वर धरणातून रब्बी पिकासाठी पूर्णा कालव्यात सोडले पहिले आवर्तन 

सिद्धेश्वर धरणातून रब्बी पिकासाठी पूर्णा कालव्यात सोडले पहिले आवर्तन 

Aundha Nagnath Siddheshwar Dam: तालुक्यातील सिद्धेश्वर धरणाच्या पूर्णा कालव्यातून रब्बी पिकांसाठी पहिल्या पाणीपाळीचे आवर्तन दिनांक एक नोव्हेंबर रोजी सकाळी ९:३० वाजता सोडण्यात आले असून धरण

Nov 01, 2026
भरधाव कार उतरली रस्त्याच्या खाली सुदैवाने जीवितहानी टळली..

भरधाव कार उतरली रस्त्याच्या खाली सुदैवाने जीवितहानी टळली..

Aundha Nagnath Car Accident: औंढा नागनाथ ते जिंतूर जाणार्‍या मार्गावर औंढा नागनाथ तालुक्यातील धार फाटा येथील वळण रस्त्यावर जिंतूर कडून औंढा नागनाथ कडे येणारी भरधाव कार वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने.

Oct 28, 2026
'महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय?, याची वाट पाहतोय'; वाहतूक व्यवस्थेवर राज ठाकरेंची टीका

'महाराष्ट्र माझ्या हातात सत्ता कधी देतोय?, याची वाट पाहतोय'; वाहतूक व्यवस्थेवर राज ठाकरेंची टीका

नवी मुंबईतील मेळाव्यात राज ठाकरेंनी वाहतूक, ई-चलान आणि शहर नियोजनावर टीका करत कार्यकर्त्यांना वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले.

Oct 26, 2026