Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ट्रॅक्टर दुचाकी अपघात

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल

Tractor Bike Accident: हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याची वाडी ते कळमनुरी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक देऊन २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.


भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक एकाचा मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल

Tractor Bike Accident |

ढोलक्याची वाडी ते कळमनुरी रस्त्यावरील धानोरा ज. येथे घडली अपघाताची घटना

हिंगोली (Tractor Bike Accident) : कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहागिर येथील रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर चालकाने मोटार सायकलला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात कळमनुरी पोलिसात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

या बाबत पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, कळमनुरी तालुक्यातील ढोलक्याची वाडी येथील ज्ञानेश्वर कोंडबाराव गुहाडे व विशाल रामराव गुहाडे हे २८ मार्च रोजी सकाळच्या सुमारास मोटार सायकल क्रमांक एमएच ३८ एसी ४७०९ यावर बसुन ढोलक्याचीवाडीहून कळमनुरीकडे जात होते. धानोरा जहागिर गावाजवळील रस्त्यावर भरधाव ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३८ एके ०२२५ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीने चालवून मोटार सायकलला समोरून जोराची धडक (Tractor Bike Accident) देऊन ज्ञानेश्वर गुहाडे यांना गंभीर जखमी करून विशाल रामराव गुहाडे (२१) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. 

या (Tractor Bike Accident) प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात २९ मार्चला ज्ञानेश्वर गुहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.  या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष इंगळे हे करीत आहेत.

Related to this topic: