Hingoli Superintendent of Police: शहरातील तिरूपती नगर भागात चोरट्यांनी शुक्रवारी चांगलाच हैदोस घातला. ज्यामध्ये दोन मोटार सायकल चोरून नेण्यात आल्या. या भागात चोरट्यांनी काही घरांची रेकी
तिरूपती नगरात दोन वाहने चोरली; सीसीटीव्हीने टिपला चोरट्यांचा हैदोस
तोंडावर कपडा गुंडाळल्याने पटेना चोरट्यांची ओळख
हिंगोली (Hingoli Superintendent of Police) : शहरातील तिरूपती नगर भागात चोरट्यांनी शुक्रवारी चांगलाच हैदोस घातला. ज्यामध्ये दोन मोटार सायकल चोरून नेण्यात आल्या. या भागात चोरट्यांनी काही घरांची रेकी केल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले.
हिंगोली शहरातील उच्चभू्र म्हणुन ओळखल्या जाणार्या तिरूपती नगर भागामध्ये २० जून रोजी मध्यरात्री पाच चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून प्रवेश केला. विशेष म्हणजे कोणालाही पायाचा आवाज येऊ नाही म्हणुन त्यांनी पायातील बुट व चप्पल काढून हातात घेतल्या. चोरट्यांनी काही घराच्या संरक्षण भिंतीवरून उड्या मारून प्रवेश केला. परंतु चोरी कुठेही करता आली नाही. याच दरम्यान या भागातील रहिवाशी विजय लोथे यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या दोन मोटार सायकली चोरट्यांनी पळविल्या. शुक्रवारी सकाळच्या सुमारास लोथे यांना मोटार सायकल दिसून आले नसल्याने अनेक ठिकाणी शोधाशोध केली. परंतु मोटार सायकलचा शोध लागला नसल्याने त्यांनी हिंगोली शहर पोलिसांना माहिती देताच पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांच्यासह सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संजय मार्के, जामदार अशोक धामणे, गणेश लेकुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याचवेळी पोलिसांनी काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेर्याची पाहणी केली असता तिरूपती नगरात चोरटे तोंडाला रूमाल बांधलेल्या अवस्थेत फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्यामुळे या चोरट्यांचे चेहरे पोलिसांना ओळखता आले नाही.
या (Hingoli Superintendent of Police) प्रकरणात हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला नाही. सध्या पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी चोरटे सक्रीय होतात. अशावेळी नागरीकांनी देखील सतर्क रहावे असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.