Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

हनुमान जन्मोत्सव

श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाने हनुमान जन्मोत्सव थाटात

Hanuman Janmotsav: टेकाडी येथील श्री हनुमान मंदिरात श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य भव्य महाप्रसाद सोहळा व भजन सप्ताह यशस्वीरित्या साजरा करण्यात आला.


श्रीराम नवमी ते हनुमान जयंती निमित्य अखंड हरिनाम सप्ताहाने हनुमान जन्मोत्सव थाटात

Hanuman Janmotsav |

श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे पंगतीत भव्य महाप्रसाद सोहळा सम्पन्न

कन्हान (Hanuman Janmotsav) : श्री हनुमान मंदीर देवस्थान टेकाडी व्दारे श्रीराम नवमी ते श्री हनुमान जयंती निमित्त श्री हनुमान मंदीर टेकाडी येथे अखंड भजन हरिनाम सप्ताहात भजन मंडळानी पहारा देत श्री हनुमान जयंती ला दही काला व भव्य महाप्रसाद वितरण करून " जय श्री हनुमान " चा जय घोष करित श्री हनुमान जन्मोत्सव  थाटात साजरा करण्यात आला. 

श्रीराम, लक्ष्मण व सिता वनवासा दरम्यान टेकाडी येथील श्री राम सरोवर टेकाडी येथे थाबुन टेकाडी गावची भुमी पावन झाल्याने दरवर्षी प्रमाणे श्री हनुमान मंदिर टेकाडी येथे श्रीराम नवमी ते श्री हनुमान जयंती (Hanuman Janmotsav) निमित्त अखंड हरिनाम सप्ताह गुरूवार (दि.२६ ) मार्च ते गुरुवार (दि.२) एप्रिल २०२६ पर्यंत आयोजन केले होते. त्तपुर्वी बुधवार (दि.२५) मार्च ला सायंकाळी श्री हनुमान मंदीरात पुजा अर्चना करून भव्य शोभाया त्रा काढुन बैलगाडीवर मनमोहक, श्री राम सिता, लक्ष्मण यांची सजीव झाकी, पादुका पालखी, सोबत राम सरोवर अखाडा, हनुमान झाकी, रामरथ, डी जे, बँड व महिला भजन मंडळा सोबत मनमोहक शिव तांडव नुत्य, महाकाल रुपाने लोकांना आकर्षित करून उप स्थित जन समुहाला मंत्रमुग्ध केले.

गुरूवार (दि.२६) मार्च ला सकाळी पासुन रोज २४ × ७ च्या स्वरुपात सतत सात दिवस भजनी मंडळांचा पहारा भजनाने अखंड हरिनाम सप्ताहाने परिसर भक्तीमय करण्यात आला. यात हुड मोहल्ला भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, जय मॉ दुर्गा भजन मंडळ, श्री मारोती नंदन भजन मंडळ, आरती गन भजन मंडळ, जय रघुनं दन भजन मंडळ, संत गजानन भजन मंडळ आदिनी अखंड भजनाने पहारा दिला. गुरूवार (दि.२) एप्रिल ला दुपारी १२ वाजता दही लस्सी वितरण करून दुपा री १ वाजता हजारो श्रीराम व श्री हनुमान भक्तांच्या उपस्थित भव्य महाआरती करुन मान्यवराच्या हस्ते दंहीहंडी फोडुन दहिकाल्याचा प्रसाद वितरण करण्यात आला.

सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजे पर्यंत उपस्थित भाविकांनी पंगती मध्ये बसवुन भव्य महाप्रसादाचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमास खासदार, राज्यमंत्री व आमदार, माजी जि प अध्यक्षा, माजी जि प सदस्य, माजी प स सभापती, उपसभापती, सामाजिक कार्यक र्ते, मान्यवरांनी उपस्थित होऊन दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी पंचकोशीतील दहा हजारांच्यावर महिला, पुरू ष भाविक मंडळीनी रांगेत पंगतीत बसुन महाप्रसादा चा आणि श्री हनुमान जन्मोत्सवाचा लाभ घेतला. (Hanuman Janmotsav) कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री हनुमान मंदीर देवस्थान कमेटी टेकाडीचे पंढरी बाळबुधे, गोपिनाथ गुरधे, मनोज लेकुरवाळे, बंडु इंगळे, जयदेव सातपैसे, नागोराव गोरले, मोतिराम सातपैसे, देवेंद्रसिंग सेंगर, सुर्यभान कुंभलकर, गावातील प्रतिष्ठीत नागरिक, बहु संख्य युवक सह समस्थ टेकाडी ग्रामस्थानी परिश्रम घेत सहकार्य केले.

Related to this topic: