Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

टेकाडी शिवार आग

टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गहाच्या पीकाची राख रांगोळी

Hillside Farm Fire: टेकाडी शिवारातील शेतात अचानक आग लागल्याने शेतक-यांच्या गव्हाच्या पीकाची जवळपास शंभर एकरातील नुकसान झाले आहे.


टेकाडी शिवारातील शेतात आग लागल्याने गहाच्या पीकाची राख रांगोळी

Hillside Farm Fire |

शेतक-यांचा तोंडचा घास हिसकावल्याने शेतकरी चिंतातुर, शासनाकडे मदतीची मागणी

कन्हान (Hillside Farm Fire) : पारशिवनी तहसिल अंतर्गत टेकाडी शिवारा तील टेकाडी - बोरडा पांधन रस्त्या लगतच्या गव्हाच्या शेतात अचानक आग लागुन जवळपास शंभर एकरा तील उभे गव्हाचे पीक जळुन राख रांगोळी झाल्याने काबडकष्ट केलेल्या शेतक-यांचा तोंडचा घास आगीने हिसकावल्याने शेतकरी चिंतातुर झाल्याने शेतकरी परिसरातील शेतक-यांनी सरकार, शासनाने नुकसान ग्रस्त शेतक-यांना तातडीने आर्थीक मदतीची मागणी केली आहे. 

शेतक-यांनी सांगितले की, सोमवार (दि.२३) मार्च ला सकाळी १०.३० वाजता दरम्यान शैलेश सात पैसे हे रतन आणि गणेश कांबळे यांची १३ एकर शेती ठेक्याने केलेल्या शेतातील उभ्या गव्हाच्या पीकाला अचानक आग लागुन तेज हवेमुळे आगीने रौद्र रूप धारण करून आजु बाजुच्या शेतात आग (Hillside Farm Fire) पसरून शेता तील उभ्या गव्हाच्या पिकाची राख रांगोळी झाली.यात रतन कांबळे, गणेश कांबळे १३ एकर, कमलाकर राऊ त २ एकर, श्यामराव मरघडे २.५ एकर, गुलाब राउत ५ एकर, नामदेव कांबळे १.५ एकर, संदीप राऊत ५ एक र, रामभाऊ राऊत २ एकर, शकुंनबाई सावरकर २ एकर, उत्तम सातपैसे ६ एकर, रामराव सातपैसे १.५ एकर, येणेकर १२.५ एकर सह इतरही शेतक-यांचा शेतातील गव्हाच्या पिकाचा समावेश आहे.

या (Hillside Farm Fire) आगीच्या घटनेत आगीवर नियंत्रण मिळे पर्यंत जवळपास शंभर एकरातील उभे गव्हाचे पिक जळुन राख रांगो ळी झाल्याने शेतक-यांचे अतोनात नुकसान होऊन शेतक-यांच्या तोंडी आलेला घास आगीने हिसकावि ल्याने परिवाराच्या उदनिर्वाकरिता शेतकरी चिंतातुर झाला आहे. शेतक-यांनी आपल्या परिने आग विझवि ण्याचा पर्यंत केला. आगीच्या घटनेची माहिती अग्नि शामक विभागाला मिळताच नगरपरिषद कन्हान-पिपरी, कामठी, नगरपंचायत कांद्री, महादुला येथील चार अग्निबंब च्या वाहन गाड़या घटनास्थळी पोहचुन आगीवर नियंत्रण मिळे पर्यंत शेतक-यांचे मोठ्या प्रमा णात गव्हाचे पिक जळुन राख रांगोळी झाली. अग्नि शामक बंबने आगीवर नियंत्रण मिळविल्याने परिसरा तील इतर शेतक-यांच्या गव्हाचे पिक आगी पासुन वाचविण्यात आले.

घटनास्थळी कन्हान पुलिस निरी क्षक वैजयंती मंडवधरे, सपोनि रोशन बावनकर, रोशन देवतळे, सम्राट वनप्रती सह पोलीस कर्मचा-यांनी पोह चुन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. तसेच संबंधित विभागाचे अधिका-यांनी घटनास्थळी पोहचुन नुकसान ग्रस्त शेतक-यांच्या शेताचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठ अधिका-याना पाठविला आहे. आगीने झालेल्या नुकसान ग्रस्त शेतक-यांना सरकार, शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी ग्रा. पं. बोरडा (ग) उपसरपंच नरेंद्र ठाकरे, भगवानदास यादव, राजु गुडधे, हरिश भेलावे, शैलेश सातपैसे, रामकृष्ण हुड, विशाधर कांबळे, क्रिष्णा कांबळे, टेकाडी, बोरडा सह परिसरातील शेतक-यांनी केली आहे.

Related to this topic: