Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

शेतकऱ्यांचे नुकसान

तहसीलदारांनी पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे केले नुकसान!

Tehsildar corruption: मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांवर भ्रष्टाचार व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.


तहसीलदारांनी पदाचा गैरवापर करून शेतकऱ्यांचे केले नुकसान

Tehsildar corruption |

गव्हा येथील शेतकरी हेडा कुटुंबानी केला भ्रष्टाचाराचा आरोप! 
जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार!

मानोरा (Tehsildar corruption) : गट क्र. १९ व २० या शेतजमिनीच्या वादाने आता तीव्र स्वरूप धारण केले असून, गव्हा येथील शेतकरी दुर्गाबाई वसंत कुमार हेडा, संदीप वसंत कुमार हेडा, योगिता संदीप हेडा व वसंत कुमार विश्वनाथ हेडा यांनी तहसीलदार मानोरा यांच्यावर थेट संगनमत, भ्रष्टाचार व शेतकऱ्यांचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याचा गंभीर आरोप केला असुन तसे तक्रार निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे. 

सदर शेतकऱ्यांच्या लेखी तक्रारीनुसार गट क्र. १९ व २० मधील नाल्यालगत पूर्वीपासून अस्तित्वात असलेला रस्ता जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला असून, गैरअर्जदार दयाराम रावजी राठोड याने प्रशासनाशी संगनमत करून “रुंदीकरण” या नावाखाली नवीन रस्ता लादण्याचा प्रयत्न केला आहे. या (Tehsildar corruption) प्रकरणात तहसीलदारांनी आपल्या पदाचा गैरवापर करत एकतर्फी व मनमानी आदेश दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. “आमच्या शेतीवर थेट घाला घालणारा हा निर्णय असून, यामध्ये आर्थिक व्यवहार व दबावाचे राजकारण झाले असल्याची आम्हाला खात्री आहे,” असे हेडा कुटुंबीयांनी स्पष्टपणे सांगितले.

शेतकऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे त्यांच्या शेतजमिनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतीयोग्य क्षेत्र कमी झाले आहे. तसेच प्रशासनाने वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून खोट्या कारणांवर आधारित निर्णय घेतल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  नाल्यालगत असलेला मूळ रस्ता जाणीवपूर्वक नष्ट करण्यात आला,  खोट्या कारणावरून नवीन रस्ता जबरदस्ती लादण्यात आला, तहसीलदारांनी पदाचा गैरवापर करून एकतर्फी आदेश दिला, प्रशासनाचा गैरवापर करून शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्यातआला, असा आरोप तक्रारकर्त्यांनी निवेदनातून केला आहे. 

या (Tehsildar corruption) सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या हेडा कुटुंबीयांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्रमक निवेदन सादर करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. यात तहसीलदारांच्या आदेशाला स्थगिती देणे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणे, संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आणि मूळ रस्ता पूर्ववत करणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर आम्हाला तात्काळ न्याय मिळाला नाही, तर आम्ही आमरण उपोषणासारखे तीव्र आंदोलन उभारू. अशा वेळी निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन जबाबदार राहील.

तसेच, या (Tehsildar corruption) प्रकरणात खोटे पुरावे सादर करणाऱ्या व प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे मानोरा तालुक्यात खळबळ उडाली असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता वरिष्ठ अधिकारी या गंभीर आरोपांवर कोणती भूमिका घेतात आणि गव्हा येथील हेडा कुटुंबाला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Related to this topic: