Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > मराठवाडा > परभणी

तहसीलदार भारत गंगावणे

परभणीत वेळेवर या, अन्यथा कारवाईला सामोरे जा; तहसीलदारांचा इशारा

Tehsildar Bharat Gangavane: जिल्ह्यातील पाथरी तालुक्याचे महसुल प्रशासन अधिक प्रभावी, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे


परभणीत वेळेवर या अन्यथा कारवाईला सामोरे जा तहसीलदारांचा इशारा

Tehsildar Bharat Gangavane |

 

तहसीलदारांनी काढले परिपत्रक; नव्या तहसीलदारांची शिस्त मोहीम सुरू

परभणी (Tehsildar Bharat Gangavane) : जिल्ह्यातील पाथरी तालुक्याचे महसुल प्रशासन अधिक प्रभावी, गतिमान व लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने नव्याने रुजू झालेले तहसीलदार भारत गंगावणे (Tehsildar Bharat Gangavane) यांनी कार्यालयीन शिस्तीबाबत भूमिका घेतली असून अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी मंगळवारी एक परिपत्रक जारी केले आहे .

मंगळवार १२ मे रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार बुधवार १३ मे  पासून तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजित वेळेत कार्यालयात उपस्थित राहून कामकाज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गट ड कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० तर गट अ ते क कर्मचाऱ्यांसाठी सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ अशी कार्यालयीन वेळ निश्चित करण्यात आली आहे. संबंधितांनी या वेळेत उपस्थिती नोंदविणे आवश्यक राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

तसेच सलग तीन दिवस विलंबाने कार्यालयात हजर राहणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची एक दिवसाची रजा कपात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वारंवार सूचना देऊनही वेळेत उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्या दिवसाची अनुपस्थिती ग्राह्य धरून त्यांना विनावेतन करण्यात येईल तसेच संबंधितांविरुद्ध नियमानुसार प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येणार असल्याचा इशाराही तहसीलदारांनी दिला आहे.

नव्याने रुजू झाल्यानंतर तहसीलदार भारत गंगावणे (Tehsildar Bharat Gangavane) यांनी  कार्यालयातील प्रशासकीय घडी बसविण्यास सुरुवात केली असून शिस्त वेळेचे पालन आणि नागरिकांच्या कामांना प्राधान्य देण्यावर भर दिला जात असल्याचे  दिसून येत आहे. तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या आदेशाची चर्चा सुरू असून प्रशासनातील शिस्तीमुळे नागरिकांची कामे अधिक वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.